Ind vs SA, 3rd Test: जेनसनला बाद केल्यानंतर बुमरहने दिली अशी प्रतिक्रिया की...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 13, 2022 | 12:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Jasprit Bumrah:बुमराह आणि जेनसेन यांच्यात दुसऱ्या कसोटीमध्ये वाद पाहायला मिळाला होता. ही घटना तेव्हा घडली होती जेव्हा जेनसेनेने बुमराहवर शॉर्ट बॉल टाकले होते. 

bumrah-jansen
जेनसनला बाद केल्यानंतर बुमरहने दिली अशी प्रतिक्रिया की... 
थोडं पण कामाचं
  • बुमराह आणि जेनसेनयांच्यात दुसऱ्या कसोटीदरम्यान वाद पाहायला मिळाला होता.
  • ही घटना तेव्हा घडली जेव्हा जेनसेनने बुमराहला अनेक शॉर्ट बॉल टाकले होते
  • बुमराहने  त्याचा बदला घेत जेनसेनला ७ धावांवर क्लीन बोल्ड केले

मुंबई: टीम इंडियाचा(team india) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने(jasprit bumrah) द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात कमाल केली. केपटाऊनमध्ये(capetown) खेळवल्या जात असलेल्या या मालिकेतील अखेरच्या सामन्यात बुमराहने ४२ धावा देत ५ विकेट आपल्या नावे केल्या.आपल्या कसोटी करिअरमध्ये ७व्यांदा एका डावात ५ विकेट घेण्याची कमाल त्याने केली आहे. बुमराहने मार्को जेनसेनला आपले शिकार बनवले. jasprit bumrah reaction after dismissed marco jansen 

बुमराह आणि जेनसेनयांच्यात दुसऱ्या कसोटीदरम्यान वाद पाहायला मिळाला होता. ही घटना तेव्हा घडली जेव्हा जेनसेनने बुमराहला अनेक शॉर्ट बॉल टाकले होते. बुमराहने  त्याचा बदला घेत जेनसेनला ७ धावांवर क्लीन बोल्ड केले. बुमराहने विकेट घेतल्यानंतर जेनसेन रागात दिसला. मात्र दोघांमध्ये कोणतेही बोलणे झाले नाही. दिवसाचा खेळ संपल्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये बुमराहला याबाबत सवाल करण्यात आला. त्याने सांगितले की या कसोटीत जेनसेन आणि त्याच्यात काहीच बोलणे झाले नाही. दोन्ही संघ ज्या पद्धतीन खेळ करू इच्छितात तसेच खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. 

बुमराह आणखी काय म्हणाला...

जसप्रीत बुमराहने सांगितले की मला लक्षात नाही की मी या सामन्यात त्याच्याशी बोललो आहे.. गेल्या सामन्यात जे झाले ते तिथेच संपले आणि आपल्याला नेहमी पुढे गेले पाहिजे. या सामन्यात मी त्याच्यासोबत चर्चा तसेच डोळ्यांनी संवाद साधल्याचेही आठवत नाही. मात्र आमच्या संघाने काय केले पाहिजे यावर आम्ही लक्ष देत आहोत. प्रतिस्पर्धी संघाला जे करायचे आहे ते करू शकतात. आपल्या संघाला योग्य प्रकारे साथ देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. 

बुमराहने केवळ जेनसनचीच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेच्या चार आणखी विकेट घेतल्या. त्याच्या ४२ धावांवर ५ बाद या धमाकेदार कामगिरीमुळे यजमान संघाचा डाव २१० धावांवर आटोपला. टीम इंडियाने पहिल्या डावात २२३ धावा केल्या होत्या. त्यांनी २३ धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दोन बाद ५७ धावा केल्या. लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल स्वस्तात परतले. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा खेळत आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी