Jasprit Bumrah unfit difficult to play IPL 2023 and WTC final : टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही टीमचा मुख्य वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह अनफिट आहे. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (World Test Championship : WTC) फायनल मॅच आणि आयपीएल 2023 (Indian Premier League 2023 : IPL 2023) या दोन्ही स्पर्धांमधून बाद होण्याची शक्यता आहे. दुखापतीचे स्वरुप बघता बुमराह लवकर खेळण्यासाठी मैदानात येणे कठीण दिसत आहे.
बुमराहच्या दुखापतीचे स्वरुप अतिशय गंभीर दिसत आहे. या दुखापतीमधून सावरण्यासाठी जास्त वेळ लागेल, असा प्राथमिक अंदाज आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 दरम्यान भारतात वन डे वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धेआधी पूर्ण फिट होण्यासाठी जसप्रीत बुमराहला पुरेशी विश्रांती आणि उपचारांची आवश्यकता आहे. याच कारणामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (World Test Championship : WTC) फायनल मॅच आणि आयपीएल 2023 (Indian Premier League 2023 : IPL 2023) खेळणार नाही.
बुमराहची अनुपस्थिती टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का समजला जात आहे. बुमराहच्या दुखापतीमुळे दोन्ही टीमना त्यांच्या डावपेचांमध्ये बदल करावा लागणार आहे.
भारत पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World Test Championship : WTC) उपविजेता होता. तर मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 वेळा आयपीएल (Indian Premier League : IPL) जिंकली आहे. टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्स बुमराहला खेळवून उत्तम कामगिरी करण्यास उत्सुक होते. पण परिस्थिती बदलली आहे. यामुळे पर्यायी गोलंदाजांच्या मदतीने नव्याने डावपेचांची आखणी करून दोन्ही टीम खेळणार आहेत.
जास्त चिकन खाल तर तब्येत बिघडवाल
Fact Check : selfie चा अतिरेक skin साठी घातक
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 मध्ये अतिशय वाईट कामगिरी केली होती. पॉइंट्स टेबलमध्ये 10व्या स्थानावर फेकल्या गेलेल्या मुंबई इंडियन्सचे आव्हान लीग मॅचमध्येच संपले होते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मुंबई इंडियन्सला उत्तम बॉलरची आवश्यकता होती. ही गरज आता जोफ्रा आर्चर भागवू शकेल, अशी आशा व्यक्त होत आहे. जोफ्रा आर्चर फिट आहे आणि आयपीएल 2023 खेळणार आहे. यामुळे मुंबई इंडियन्सला थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.