Rohit Sharma: रोहित शर्मा शेवटच्या कसोटीतून बाहेर, विराट नव्हे हा खेळाडू कसोटी संघाचा कर्णधार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 29, 2022 | 19:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rohit Sharma: टीम इंडिया पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भिडणार आहे. मात्र या कसोटीआधी रोहित शर्मा बाहेर झाला आहे. 

rohit sharma
कसोटी संघात विराट नव्हे हा खेळाडू कसोटी संघाचा कर्णधार 
थोडं पण कामाचं
  • रोहित शर्माबाबतची माहिती समोर आली आहे.
  • रोहित इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीआधी बरा होणार नाही आहे आणि आता त्याला या मोठ्या सामन्यातून बाहेर जावे लागत आहे.
  • रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह संघाचा कर्णधार आहे.

मुंबई: टीम इंडिया(team india) पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला इंग्लंडविरुद्धच्या(india vs england) ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या शेवटच्या सामन्यात भिडणार आहे. मात्र या सामन्यातून ठीक आधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे जेव्हा टीमचा हिटमॅन ओपनर आणि कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) कोरोनाने संक्रमित झाला आहे. संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती की रोहित पाचव्या कसोटीत खेळणार की नाही. दरम्यान, आता रोहित खेळण्याबाबतचे नवे अपडेट समोर आले आहे. jasprit bumrah will be captain for one test match against england

अधिक वाचा - १ जुलैपासून तुमच्या घरातून या वस्तू होणार गायब

रोहित पाचव्या कसोटीतून बाहेर

रोहित शर्माबाबतची माहिती समोर आली आहे. खरंतर, रोहित इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीआधी बरा होणार नाही आहे आणि आता त्याला या मोठ्या सामन्यातून बाहेर जावे लागत आहे. रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह संघाचा कर्णधार आहे. न्यूज एजन्सी एएनआयने या गोष्टीचा खुलासा केला आहे. रोहित पाचव्या कोटीच्या आधी सरावादरम्यान कोरोनाने बाधित झाला होता आणि आता तो पूर्णपणे ठीक झालेला नाही. 

जसप्रीत बुमराह आहे तयार

इतकंच नव्हे तर जसप्रीत बुमराह स्वत: टीम इंडियाचा नवा कर्णधार बनण्यासाठी तयार आहे. ज्या वेळेस भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते तेव्हा त्याला विचारण्यात आले होते की तो कर्णधारपदाची जबाबदारी घेण्यास तयार आहे का? त्यावेळेस बुमराह म्हणाला होता की जर भविष्यात त्याला ही जबाबदारी मिळाली तर तो यासाठीही तयार आहे. आता रोहित वेळेआधी बरा होत नसल्याने बुमराहचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. 

अधिक वाचा - जावयाकडून कुऱ्हाडीनं सासू-सासऱ्यांची हत्या, कारण आलं समोर

रोहितला झाला कोरोना

संघाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. रोहित शर्मा शनिवारी रॅपिड अँटीजन कसोटीत कोरोना पॉझिटिव्ह आढळला. याची माहिती बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून दिली. लीसेस्टरशारयरविरुद्धच्या खेळवल्या जात असलेल्या ४ दिवसांच्या सराव सामन्यात रोहित संघाचा हिस्सा होता. त्याने पहिल्या डावात फलंदाजी केली होती मात्र दुसऱ्या डावात फलंदाजीस उतरला नव्हता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी