हा चॅम्पियन खेळाडू भारताला मिळवून देऊ शकतो वर्ल्ड कप :  मायकल क्लार्क 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 24, 2019 | 21:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

ऑस्ट्रेलियाला २०१५ मध्ये वर्ल्ड कप चॅम्पियन बनविणारा कर्णधार मायकल क्लार्कने भारत आणि ऑस्ट्रेलियाला सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये खिताबी विजय मिळवण्यात या दोन खेळाडूंची महत्त्वाची भूमिका असणार आहे. 

team india
रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, केदार जाधव 

मॅन्चेस्टर :   ऑस्ट्रेलियाला २०१५ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनविणारा कर्णधार मायकल क्लार्कचे मत आहे की जसप्रित बुमराहच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारत वर्ल्ड कप जिंकू शकतो, तर ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नरच्या शानदार फलंदाजच्या जोरावर पुन्हा वर्ल्ड कप आपल्या नावावर करू शकतो. क्लार्कने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ पहिल्या तीन संघात असणार आहे. केवीन पीटरसन किंवा मायकल वॉन काहीही म्हणत असले तरी यंदा इंग्लंड वर्ल्ड कप जिंकणार नाही. 

क्लार्कने म्हटले की, बुमराहकडे सर्व काही आहे. तो फीट आहे आणि स्वस्थ आहे. तो वर्ल्ड कपत्यामध्ये भारताच्या विजयाची चावी आहे.  त्याने म्हटले की बुमराहला ऑस्ट्रेलियाचे विशेषतः  वॉर्नरचे आव्हान मिळणार आहे. जो सहा सामन्यात ४४७ धावा करून फलंदाजांमध्ये क्रमांक एकवर आहे.  क्लार्क म्हणाला, मला वॉर्नरकडून अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा होती. कारण तो असाधारण खेळाडू आहे. तो संघाचा एक्स फॅक्टर आहे. ऑस्ट्रेलिया  जर वर्ल्ड कप जिंकेल तर वॉर्नर हा सर्वाधिक धावा काढेल. 

बुमराह इतका खतरनाक गोलंदाज का आहे, त्यावर क्लार्क म्हणाला,  नव्या चेंडूने तो स्विंग आणि सीम करू शकतो.  तर मधल्या षटकांमध्ये मदत मिळत नाही त्यावेळी तो आपल्या अतिरिक्त वेगाने फलंदाजांना अडचणीत आणू शतो. तो १५० च्या वेगाने चेंडू टाकू शकतो. त्याचा यॉर्कर शानदार आहे. रिवर्स स्विंग मिळाल्यावर तो जिनियस आहे. 

क्लार्क पुढे म्हणाला, कोणत्याही कर्णधाराला एक असा गोलंदाज हवा असतो की तो गरजेच्यावेळी संघाला विकेट मिळवून देईल. तो गोलंदाजीची सुरूवात करू शकेल, ३५ वे षटक टाकू शकेल आणि डेथ ओव्हरमध्येही चांगली गोलंदाजी करू शकेल. बुमराह असा गोलंदाज आहे की जो भारताला वर्ल्ड कपची फायनल जिंकू देऊ शकतो. 

भारताविरूद्ध धिम्या गतीने फलंदाजी करणाऱ्या वॉर्नरवर टीका झाली होती. पण क्लार्कने म्हटले की, तो परिस्थितीनुसार स्वतःला तयार करत होता.  तो म्हणाला, वन डे क्रिकेट आणि टी -२० क्रिकेट वेगवेगळे आहेत. एका फॉर्मटमधून दुसऱ्यात स्वीच होता. थोडा वेळ लागतो. त्याने त्या खेळीत सांभाळून सुरूवात केली. त्यानंतर दोन शतक झळकावले आहेत. त्यातून सिद्ध होते की तो किती चांगला फलंदाज आहे. त्याने वर्ल्ड कपमध्ये चतुराईने फलंदाजी केली आहे. 

क्लार्कने भारतीय कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे, विराटची कॅप्टन्सी चांगली राहिली आहे. तो असाधारण खेळ खेळत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
हा चॅम्पियन खेळाडू भारताला मिळवून देऊ शकतो वर्ल्ड कप :  मायकल क्लार्क  Description: ऑस्ट्रेलियाला २०१५ मध्ये वर्ल्ड कप चॅम्पियन बनविणारा कर्णधार मायकल क्लार्कने भारत आणि ऑस्ट्रेलियाला सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये खिताबी विजय मिळवण्यात या दोन खेळाडूंची महत्त्वाची भूमिका असणार आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola