Bumrah: टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर नाही गेला बुमराह, चाहत्यांसाठी खुशखबर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 30, 2022 | 18:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 World Cup 2022:टी-20 वर्ल्डकप 2022च्या आधी भारतीय चाहत्यांसाठी एक बातमी समोर आली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेतून बाहेर गेलेला नाही. 

jasprit bumrah
टी20 वर्ल्डकपमधून बाहेर नाही गेला बुमराह,चाहत्यांसाठी खुशखबर 
थोडं पण कामाचं
  • द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यानंतर जसप्रीत बुमराह आपल्या पाठीच्या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी मालिकेतून बाहेर गेला होता
  • मेडिकल टीमने त्याला टी-20 वर्ल्डकप 2022 मधून अद्याप बाहेर गेलेले नाही
  • त्याच्या पाठीला जी दुखापत झाली आहे त्यासाठी सर्जरीची गरज नाही

मुंबई: द. आफ्रिकाविरुद्ध खेळवली जात असलेली तीन सामन्यांची टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला मोठा झटका बसला. संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर गेला आहे. बुमराहची दुखापत पाहता अशाही बातम्या समोर आल्या होत्या की तो टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा भाग होणार नाही मात्र रिपोर्टनुसार आताही तो टीमचा भाग बनू शकतो. Jasprit numrah can fly with team india for australia

अधिक वाचा - आज या राशींना होणार लाभ

भारतीय चाहत्यांसाठी मोठी खुशखबर

द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यानंतर जसप्रीत बुमराह आपल्या पाठीच्या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी मालिकेतून बाहेर गेला होता. मेडिकल टीमने त्याला टी-20 वर्ल्डकप 2022 मधून अद्याप बाहेर गेलेले नाही.. त्याच्या पाठीला जी दुखापत झाली आहे त्यासाठी सर्जरीची गरज नाही. यासाठी जसप्रीत बुमराहला 6 ऑक्टोबरला टीमसोबत तो ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो. दरम्यान टी20 वर्ल्डकपमध्ये त्याच्या सहभागाबाबतचा निर्णय 15 ऑक्टोबरला केला जाणार आहे. 

टी-20 वर्ल्डकप मध्ये मिळू शकते जागा

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इनसाईडस्पोर्टला सांगितले, बुमरालहा आरामाची गरज आहे कारण हेच पाठीच्या दुखापतीसाठी चांगले औषध आहे. दरम्यान, तो एनसीएच्या मेडिकल स्टाफच्या संपर्कात राहील. नितीन सीधे त्यांच्या ठीक होण्याबाबत लक्ष देऊन आहेत. आ्ही त्याला टी-20 वर्ल्डकपमधून पूर्णपणे बाहेर करत नाही आहोत. तो टीमसोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आणि तेथे रिकव्हरी सुरू ठेवणार. आमच्याकडे बदलासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. 

अधिक वाचा - कोंड्याची समस्या मुळापासून दूर करायचीय?, करा हा घरगुती उपाय

पाठदुखीच्या गंभीर समस्येचा शिकार

जसप्रीत बुमराह आशिया कप 2022आधीही पाठदुखीने त्रस्त होता. यामुळे तो आशिया कपमध्येही खेळू शकला नव्हता. 2019मध्येही जसप्रीत बुमराह स्ट्रेस फ्रॅक्चरच्या कारणामुळे टीम इंडियाबाहेर गेला होता. अनेक दिग्गजांचे म्हणणे आहे की त्याच्या  पुनरागमनबाबत टीम इंडियाने खूप घाई केली. त्याला आराम मिळायला हवा होता. जसप्रीत बुमराहने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमन केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी