Ind vs pak.: .तर टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताकडून पाकिस्तानचा पराभव होणार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 15, 2021 | 16:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

मियाँदादने सांगितले की टूर्नामेंटमध्ये लय मिळवण्यासाठी भारताविरुद्धचा सामना महत्त्वाचा असेल. त्यांचा संघ मजबूत आहे आणि त्यांच्याकडे असे अनेक खेळाडू आहे मात्र आम्हाला कोणताही दबाव न घेता खेळावे लागेल. 

india pakistan
...तर टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये पाकिस्तानचा पराभव होणार 
थोडं पण कामाचं
  • भारत आणि पाकिस्तानला सुपर -12 च्या एकाच गटात स्थान देण्यात आले आहे.
  • विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत होणार आहे.
  • माजी दिग्गज क्रिकेटर जावेद मियाँदाद यांनी बाबर आझम अँड कंपनीला सल्ला दिला आहे.

कराची: टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा पहिला सामना भारताविरुद्ध रंगणार आहे. आयसीसीच्या इव्हेंटमध्ये पाकिस्तानविरुद्धचा भारताचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. दोन्ही देशांदरम्यान १३ सामने खेळवण्यात आले. यात पाकिस्तानला एकदाही विजय मिळालेला नाही. वनडे वर्ल्डकपमध्ये दोन्ही देश सात वेळा तर टी-२० वर्ल्डकपमध्ये पाच वेळा आमनेसामने आलेत. टी-२० वर्ल्डकपमध्ये दोन्ही देश सहाव्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आता यावेळी पाकिस्तानचा प्रयत्न असेल की ते मागचा रेकॉर्ड तोडतील. 

पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय मिळवणे तितकेसे सोपे होणार नाही मात्र यावेळीस माजी दिग्गज क्रिकेटर जावेद मियाँदाद यांनी बाबर आझम अँड कंपनीला सल्ला दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की जर टी-२० वर्ल्डकपमध्ये जर त्यांच्या देशाच्या संघाला विजय मिळवायचा असेल तर त्यांना निर्भीड राहून खेळावे लागेल. मियाँदाद म्हणाले टूर्नामेंटमध्ये लय मिळवण्यासाठी भारताविरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. त्यांचा संघ मजबूत आहे. त्याच्याकडे अनेक चांगले खेळाडू आहेत. मात्र हे खेळाडू निर्भीडपणे या स्पर्धेत तसेच या सामन्यात खेळले तर नक्कीच भारताला हरवू शकतो. जर पाकिस्तानचा संघ निर्भयपणे खेळला तर नक्कीच आम्ही त्यांच्यावर विजय मिळवू. 

मियाँदाद पुढे म्हणाले, पाकिस्तानच्या संघाने सामूहिक प्रयत्न केले तर ते स्पर्धेत नक्कीच चांगले यश मिळवू शकतील. टी-२० बाबत लोकांचे मत आहे की एक अथवा दोन खेळाडू सामना जिंकून देऊ शकतात. मात्र माझ्यामते कोणत्याही प्रकारात सांघिक प्रयत्न केले तसेच प्रत्येकाने योगदान दिले तर संघाला विजय मिळू शकतो. पाकिस्तान केवळ चांगल्या फॉर्मात असलेल्या बाबर आझमवर अवलंबून राहू शकत नाही. या प्रकारात २० धावांची छोटी खेळी, महत्त्वाचा कॅच अथवा रन आऊट अथवा एक चांगली ओव्हर सामना जिंकून देऊ शकतो. या प्रकारात सर्वांचेच योगदान महत्त्वाचे. 

भारत आणि पाकिस्तान एकाच गटात 

भारत आणि पाकिस्तानला सुपर -12 च्या एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. हे दोन्ही संघ ग्रुप-2 मध्ये आहेत. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे संघ देखील या गटात आहेत. तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला सुपर -12 च्या गट -1 मध्ये स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटात 6-6 संघ असतील. गटातील इतर संघांचे निर्णय विश्वचषक पात्रता फेरीच्या निकालांद्वारे निश्चित केले जातील.

विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत

विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत होणार आहे. पात्रता फेरीसह एकूण 45 सामने खेळले जातील. यापैकी 12 सामने क्वालिफायर फेरीत आणि 30 सामने सुपर -12 फेरीत खेळले जातील. याशिवाय 2 उपांत्य आणि 1 अंतिम सामना खेळला जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी