झूलन गोस्वामीने घेतल्या ६०१ विकेट

झूलन गोस्वामीने क्रिकेट कारकिर्दीत ६०१ विकेट घेण्याची कामगिरी केली.

Jhulan Goswami completed 600 career wickets
झूलन गोस्वामीने घेतल्या ६०१ विकेट 
थोडं पण कामाचं
  • झूलन गोस्वामीने घेतल्या ६०१ विकेट
  • ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वन डे मॅचमध्ये भारताच्या झूलन गोस्वामीने तीन विकेट घेतल्या
  • झूलनने दोन फलंदाजांना शून्यावर बाद केले

मकाय (Mackay): भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये झालेल्या तिसऱ्या वन डे मॅचमध्ये भारताने दोन विकेट राखून विजय मिळवला. पण ऑस्ट्रेलियाने वन डे सीरिज २-१ अशी जिंकली. या वन डे मॅचमध्ये भारताच्या झूलन गोस्वामीने तीन विकेट घेतल्या आणि क्रिकेट कारकिर्दीत ६०१ विकेट घेण्याची कामगिरी केली. झूलनने १९२ वन डे मध्ये २४० विकेट, ११ टेस्टमध्ये ४१ विकेट, ६८ टी २० मॅचमध्ये ५६ आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये २६४ अशा ६०१ विकेट घेतल्या आहेत. Jhulan Goswami completed 600 career wickets in Australia Women vs India Women 3rd ODI

टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमने ५० ओव्हरमध्ये नऊ बाद २६४ धावा केल्या. भारताने ४९.३ ओव्हरमध्ये ८ बाद २६६ धावा केल्या आणि मॅच दोन विकेट राखून जिंकली. भारताच्या झूलन गोस्वामीने ऑस्ट्रेलियाच्या राचेल हेन्स (१३ धावा), कॅप्टन मेग लॅनिंग (शून्य धावा) आणि अॅनाबेल सदरलँड (शून्य धावा) या तिघींना बाद केले. झूलनने दहा ओव्हरपैकी दोन मेडन (निर्धाव षटके) टाकल्या आणि ३७ धावा देत तीन विकेट घेतल्या. तसेच सोफी मोलिनक्स (एक धाव) हिला धावचीत करण्यासाठी उत्तम फिल्डिंग केली. नंतर फलंदाजी करताना झूलनने सात चेंडूत एक चौकार मारत नाबाद आठ धावा केल्या. या कामगिरीमुळेच झूलनला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. 

तिसऱ्या वन डे मॅचची नववी ओव्हर टाकताना झूलनने दोन विकेट घेतल्या. तिने पहिल्या चेंडूवर सलामीवीर राचेल हेन्स आणि पाचव्या चेंडूवर कॅप्टन असलेल्या मेग लॅनिंगला बाद केले. या दोन विकेट घेताच झूलनने क्रिकेट कारकिर्दीत घेतलेल्या विकेटची संख्या ६०० झाली. नंतर मॅचच्या ५०व्या ओव्हरमध्ये अॅनाबेल सदरलँडला बाद करुन झूलनने क्रिकेट कारकिर्दीत घेतलेल्या विकेटची संख्या ६०१ केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी