एजबेस्टन: इंग्लंडचा माजी कर्णधार ज्यो रूटने(joe root) एजबेस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीचा(virat kohli) एक खास रेकॉर्ड तोडलाय. भारत वि इंग्लंड(india vs england) यांच्यातील एका कसोटी मालिकेत ज्यो रूट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. कोहलीने २०१६-१७मध्ये हा रेकॉर्ड प्रस्थापित केला होता तेव्हा त्याने १०९.१६च्या सरासरीने ६५५ धावा केल्या होत्या. तेव्हा या भारतीय फलंदाजाने दोन शतके आणि दोन अर्धशतके ठोकली होती. Joe root breaks virat kohli record
अधिक वाचा - उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणी 7 जणांना अटक
या वर्षी फलंदाजीत दमदार कामगिरी करणाऱ्या रूटने ६ वर्षांपूर्वी कोहलीने प्रस्थापित केलेला रेकॉर्ड मोडला आहे. रूटने या मालिकेत ३ शतके आणि २ अर्धशतकी खेळीच्या जोरावर आतापर्यंत ६७१ धावा केल्यात. तसेच यात कोहलीला मागे टाकले आहे.
ज्यो रूट जेव्हा क्रीझवर फलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा इंग्लंडचा संघ कठीण परिस्थितीत होता. कारण इंग्लंडने १०७धावा केल्यानंतर आपले ओपनर्स एलेक्स लीस आणि जॅक क्रॉलीचे विकेट गमावले होते. ओली पोप खाते न खोलताही पॅव्हेलियनमध्ये परतला होता. रूटच्या चुकीमुळे अॅलेक्स लीस ५६ धावा करत रनआऊट झाला होता.
यानंतर ३१ वर्षीय रूटने जॉनी बेअरस्ट्रॉसोबत मिळून इंग्लंडचा केवळ डावच सांभाळला नाही तर इंग्लंडचा विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. ज्यो रूट नाबाद ७६ आणि जॉनी बेअरस्ट्रॉ नाबाद ७२ धावांचया जोरावर इंग्लंडने आपली धावसंख्या मजबूत केली आहे. इंग्लंडला शेवटच्या दिवशी विजयासाठी ११९ धावांची आवश्यकता आहे.
अधिक वाचा - 'या' अभिनेत्याच्या मुलाला पाहून फॅन्स म्हणतात, ''हा तर...''
यजमान संघाने चौथ्या दिवशी स्टम्प्सपर्यंत ३७८ धावांचा पाठलाग करताना ५७ ओव्हरमध्ये तीन विकेट गमावताना २५९ धावा केल्या आहेत. ज्यो रूटने ११२ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावा केल्या. जॉनी बेअरस्ट्रॉने ८७ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७२ धावा केल्यात. भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या. इंग्लंडचा शेवटच्या दिवशी कसोटी सामना जिंकत मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न असेल.