ICC Test Ranking । मुंबई : इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीनंतर आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी (Test Ranking) जाहीर केली आहे. इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा संघाचा माजी कर्णधार जो रूटने (Joe Root) ताज्या आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. जो रूट ८८२ गुणांसह क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे आणि आता तो लाबुशानेला मागे टाकण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. (Joe Root finished second in the ICC Test rankings).
अधिक वाचा : पब्जी खेळायला नकार दिला म्हणून आईवर झाडल्या गोळ्या
दरम्यान, मार्नस लाबुशाने सध्या ८९२ गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत जो रूटने आणखी एक मोठी खेळी खेळली तर त्याला कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनण्याची संधी आहे. तर स्टीव्ह स्मिथ ८४५ गुणांसह तिसर्या स्थानावर असून तो सध्या पहिल्या क्रमांकाच्या शर्यतीपासून दूर असल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या चार फलंदाजांमध्ये कायम आहे. आझम ८१५ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ८०६ गुणांसह पाचव्या क्रमांकावर कायम आहे. तसेच दिमुथ करुणारत्ने ७७२ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी क्रमवारीत आपली पकड मजबूत ठेवली आहे. ख्वाजा ७५७ गुणांसह सातव्या क्रमांकावर स्थित आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ७५४ गुणांसह ८व्या स्थानावर आहे. तर हेड ७४४ गुणांसह ९व्या क्रमांकावर आहे.
लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली एका मोठ्या कालावधीपासून टॉप-१० फलंदाजांच्या यादीतून वगळला जाण्याची शक्यता आहे. विराट कोहली ७४२ गुणांसह १० व्या क्रमांकावर आहे. अव्वल १० मध्ये राहण्यासाठी विराट कोहलीला इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीत चांगली कामगिरी करावी लागेल. नाहीतर त्याची घसरण होण्याची दाट शक्यता आहे.