ICC Test Rankings: ज्यो रूटकडून नंबर १ ची खुर्ची निसटली, विराट कोहलीचेही नुकसान, पाहा कोण आहे बेस्ट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 22, 2021 | 19:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Icc test ranking इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट आता कसोटीतील नंबर वनचा फलंदाज राहिलेला नाही. अॅशेस मालिकेतील सलद दुसरा कसोटी सामना गमावल्याचे परिणाम त्याला भोगावे लागत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही सध्याच्या टेस्ट रँकिंगमध्ये एका स्थानाचे नुकसान सोसावे लागले.

joe root and virat kohli
ज्यो रूटकडून नंबर १ ची खुर्ची निसटली, विराट कोहलीचेही नुकसान 
थोडं पण कामाचं
  • अॅशेस मालिकेत जबरदस्त कामगिरी करणारा मार्नस लबुशेन कसोटीतील नंबर वनचा फलंदाज ठरला आहे.
  • भारताचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडविरु्धच्या मुंबई कसोटीतील पहिल्या डावात ० धावांवर बाद होण्याचे नुकसान सोसावे ललागले
  • ज्यो रूट दुसऱ्या स्थानावर ढकलला गेला आहे.

मुंबई: इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटला(Joe Root)  दुहेरी धक्का बसला आहे. आधी तर अॅडलेडमध्ये अॅशेस मालिकेत सलग दुसरा कसोटी सामना गमावला. त्यानंतर आता आयसीसीच्या फलंदाजांच्या ताज्या कसोटीतील रँकिंगमध्येही(ICC Test Ranking) त्याच्याकडून नंबर वनची खुर्ची काढून घेण्यात आली. त्याच्या जागी आता अॅशेस मालिकेत जबरदस्त कामगिरी करणारा मार्नस लबुशेन (Marnus Labuschagne) कसोटीतील नंबर वनचा फलंदाज ठरला आहे. लाबुशेनने पहिल्यांदा करिअरमधील सर्वोत्तम रेटिंग पॉईंट ९१२ सह कसोटीतील पहिले स्थान पटकावले आहे. त्याने ज्यो रूटला(८९७)दुसऱ्या स्थानावर ढकलले. joe root lost number one position in icc test rankings

अॅशेस मालिकेच्या आधी कसोटी रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या लबुशेनने ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या विजयात ७४ धावांची महत्त्वाची खेळी करत दोन स्थानांनी झेप घेतली होती. अॅडलेडमध्ये दुसऱ्या कसोटीत त्याने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकले होते. त्याची ही करिअरमधील सहावी आणि अॅशेसमधील पहिली सेंच्युरी होती. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला २७५ धावांनी हरवले होते. तसेच मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. 

भारताचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडविरु्धच्या मुंबई कसोटीतील पहिल्या डावात ० धावांवर बाद होण्याचे नुकसान सोसावे ललागले. ताज्या टेस्ट रँकिंगमध्ये तो एका स्थानाने घसरून सातव्या स्थानावर आला आहे. त्याच्या खात्यात ७५६ रेटिंग पॉईंट्स आहेत. रोहित शर्मा टॉप ५मध्ये कायम आहे. त्याच्या खात्यात ७९७ अंक आहेत. या दोघांशिवाय कोणताही फलंदाज टॉप १०मध्ये नाही. 

गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये मोठा बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आताही कसोटीत नंबर १ गोलंदाज आहे. त्याने नुकतेच कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या कसोटीत ७ विकेट मिळवल्या होत्या. ्यानंतर कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने अॅडलेडमधील दुसऱ्या कसोटीत तो खेळू शकला नव्हता. दुसऱ्या स्थानावर भारताचा ऑफ स्पिनर आर अश्विन आहे. अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. अश्विनने २ कसोटीत एकूण १४ विकेट मिळवल्या होत्या. तो या वर्षातील कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी