Joe Root News | नवी दिल्ली : जो रूटने शुक्रवारी (Joe Root) इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. इंग्लंडसाठी कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याचा आणि जिंकण्याचा विक्रम रूटच्या नावावर आहे. रूटने मायकेल वॉन (२६), सर ॲलिस्टर कुक (२४) आणि सर अँड्र्यू स्ट्रॉस (२४) यांना मागे टाकून इंग्लंड कसोटी संघासाठी सर्वाधिक २७ कसोटी सामने जिंकले आहेत. (Joe Root resigns as England Test captain).
दरम्यान, जो रूटने म्हटले की, "कॅरेबियन दौऱ्यावरून परतल्यानंतर आणि विचार करायला वेळ मिळाल्यानंतर मी इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या कारकिर्दीतील हा सर्वात आव्हानात्मक निर्णय आहे, परंतु मी माझ्या कुटुंबाशी आणि माझ्या जवळच्या लोकांशी याबद्दल चर्चा केली आहे. मला माहित आहे की हीच ती योग्य वेळ आहे."
अधिक वाचा : 'द काश्मीर फाईल्स' नंतर आता 'द दिल्ली फाईल्स'
"मला माझ्या देशाचे कर्णधारपद मिळाल्याचा अभिमान वाटतो आणि गेल्या पाच वर्षांकडे मी अभिमानाने मागे वळून पाहीन. इंग्लंड क्रिकेटचा संरक्षक म्हणून काम करणे ही सन्मानाची बाब आहे. असे रूटने आणखी म्हटले.
२०१७ मध्ये ॲलिस्टर कुकने राजीनामा घेतल्यानंतर कर्णधारपदाची जबाबदारी जो रूटकडे सोपवण्यात आली होती. त्याने इंग्लंडला अनेक मालिका जिंकून दिल्या. २०१८ मघ्ये भारताविरूद्ध ४-१ ने मायदेशातील मालिका आणि २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ३-१ ने मोठा विजय मिळवला. लक्षणीय बाब म्हणजे २००१ मध्ये तो २००१ नंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकणारा पहिला इंग्लंडचा पुरूष कर्णधार बनला. रूटने २०२१ मध्ये श्रीलंकेचा २-० असा पराभव करून या विक्रमाची पुनरावृत्ती केली.
अधिक वाचा : सोमय्यांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार - राऊत
तसेच फंलदाज म्हणून रूट हा माजी खेळाडू कुकनंतर इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. कर्णधार म्हणून रूटने इंग्लंडसाठी १४ कसोटी शतके झळकावली आहेत. कर्णधार म्हणून रुटच्या ५,२९५ धावा या इंग्लंडच्या कोणत्याही कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत ग्रॅमी स्मिथ, ॲलन बॉर्डर, रिकी पाँटिंग आणि विराट कोहली यांच्यानंतर रूट पाचव्या क्रमांकावर आहे.
"मला माझ्या देशाचे नेतृत्व करायला आवडते, परंतु मला अलीकडेच समजले आहे की त्याचा माझ्यावर काय परिणाम झाला आहे आणि खेळाच्या बाहेर माझ्यावर काय परिणाम झाला आहे. असे रूट म्हणाला.
त्याने आणखी म्हटले की, "मी माझ्या संघातील कॅरी, आल्फ्रेड आणि बेलाचे आभार मानतो. जे माझ्यासोबत नेहमी राहिले आणि त्यांनी मला संपूर्ण प्रेम आणि पाठिंबा दिला. माझ्या कठीण काळात मला मदत करणारे सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ. या प्रवासात ही मंडळी माझ्यासोबत असणे ही एक अभिमानाची बाब आहे.