ENG vs NZ:जॉनी बेअरस्ट्रॉने असे काही केले की सगळ्यांना आली २०१९च्या वर्ल्डकपची आठवण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 11, 2021 | 13:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Johnny Bairstow catch unsuccessful: खरंतर, क्रिस जॉर्डनच्या १७व्या ओव्हरमधील चौथा बॉल जेम्स नीशामने हवेत खेळला आणि बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या जॉनी बेअरस्ट्रॉने हा कॅच पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

match
ENG vs NZ: बेअरस्ट्रॉने असे काही केले की आठवला २०१९वर्ल्डकप  
थोडं पण कामाचं
  • अशाच प्रकारची घटना २०१९च्या वर्ल्डकपदरम्यान झाली होती
  • जेव्हा नीशामच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्सने शॉट खेळला होता आणि कॅच पकडताना ट्रेंट बोल्ट बाऊंड्री लाईनवर बाद झाला होता
  • र्डनच्या या ओव्हरने नीशमने २३ धावा काढल्या आणि येथूनच न्यूझीलंड संघाने विजयाच्या दिशेने पाऊल टाकले. 

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२१(t-20 world cup 2021)च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये(semifinal) न्यूझीलंडने(new zealand) इंग्लंडला(england) ५ विकेटनी हरवत फायनलमध्ये(final) आपले स्थान पक्के केले. जेम्स नीशन आणि डेरिल मिचेल यांच्या शेवटच्या ओव्हरमधील विस्फोटक फलंदाजीमुळे किवी संघाने इंग्लंडविरुद्ध २०१९च्या वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचा बदला घेतला. नीशमने क्रिस जॉर्डनच्या ओव्हरमध्ये २३ धावा कुटत सामन्याचे चित्रच पालटले. जॉर्डनच्या या ओव्हरमध्ये अशी घटना घडली ज्यामुळे २०१९च्या वर्ल्डकप फायनल सामन्याची आठवण आहे. बाऊंड्री लाईनवर जबरदस्त प्रयत्नानंतरही जॉनी बेअरस्ट्रो नीशामचा कॅच पकडण्यात अयशस्वी ठरला. असेच काहीसे २०१९च्या वर्ल्डकप फायनल न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान झाले होते. jonny bairstow make effort to take catch but not succesful 

खरंतर, क्रिस जॉर्डनच्या १७व्या ओव्हरमधील चौथा बॉल जेम्स नीशामने हवेत खेळला आणि बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या जॉनी बेअरस्ट्रॉने हा कॅच पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र त्याला बॅलन्स बिघडला आणि त्याने बॉल आपल्या सहकारी खेळाडूच्या दिशेने फेकत कॅच पूर्ण केला. जेव्हा रिप्लेमध्ये पाहिले गेले की कॅच पकडताना बेअरस्ट्रॉचा गुडघा बाऊंड्री लाईनला टच होत होता आणि त्यानंतर नीशानला नाबाद सांगत सहा धावा देण्यात आल्या. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

अशाच प्रकारची घटना २०१९च्या वर्ल्डकपदरम्यान झाली होती. जेव्हा नीशामच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्सने शॉट खेळला होता आणि कॅच पकडताना ट्रेंट बोल्ट बाऊंड्री लाईनवर बाद झाला होता. जॉर्डनच्या या ओव्हरने नीशमने २३ धावा काढल्या आणि येथूनच न्यूझीलंड संघाने विजयाच्या दिशेने पाऊल टाकले. 

नीशामव्यतिरिक्त डेरिले मिचेलनेही शानदार बॅटिंग केली आणि ४७ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ७२ धावांची नाबाद खेळी केली. मिचेलने क्रिसव वोक्सच्या १९व्या ओव्हरमधील पहिल्या दोन बॉलवर दोन सिक्स ठोले आणि यानंतर शेवटच्या बॉलवर बाऊंड्री ठोकत न्यूझीलंडला पहिल्या टी-२० वर्ल्डकप्च्या इतिहासात फायनलला पोहोचवले. डेवोन कॉनवेनेही दबावात चांगली फलंदाजी केली. त्याने ३८ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी