मुंबई: निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णामाचारी श्रीकांत(k shrikant) यांच्यामते ऋषभ पंतला(rishabh pant) वारंवार दिल्या जाणाऱ्या संधी तो घालवत आहे आणि त्याला आपल्या खेळात प्राण फुंकण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून(international cricket) आराम देण्याची गरज आहे. पंत मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये वारंवार अपयशी ठरत आहे. त्याने खेळातील सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये शेवटचे अर्धशतक फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले होते. k shrikant take a dig on rishabh pant
अधिक वाचा - हनीमूनला गेल्यावर करू नका 'या' 8 चुका, अन्यथा मजा ठरेल सजा
त्याने 2022मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये ज्या 21 खेळी केल्या त्यात केवळ दोनवेळा तो 30 पार धावसंख्या करू शकला. वनडेत या 25 वर्षीय विकेटकीपर फलंदाजाने या वर्षी नऊ डावांमध्ये दोन अर्धशतक आणि एक शतक ठोकले. श्रीकांतने आपल्या यूट्यूब चॅनेल चीकी चीकावर म्हटले, तुम्ही त्याला आराम देऊ शकता आणि त्याला सांगू शकता की आता थोडी वाट पाहा. पुनरागमन कर आणि भारतासाठी खेळ. तुम्ही त्याला आराम देण्याआधी काही सामन्यांची वाट पाहत आहात अथवा एक अथवा दोन सामन्यांनंतर त्याला बाहेर करायचे आहे.
ते पुढे म्हणाले, ऋषभ पंतला जितक्या संधी मिळाल्या त्याचा तो फायदा उचलू शकला नाही. मी खूप निराश आहे. हे काय आहे पंत. पंतने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत केवळ 17 धावा केल्या तर पहिल्या वनडेत तो केवळ 15 धावा करून बाद झाला होता. भारताचे माजी सलामीवीर श्रीकांत म्हणाले, तो सातत्याने संधी घालवत आहे. जर तुम्ही अशा सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहात तर ठीक आहे. वर्ल्डकप जवळ आला आहे. अनेक जण म्हणत आहेत की जर पंत धावा करू शकत नाही तर आगीत तोल ओतण्याचे काम करतोय
अधिक वाचा - बेळगावमध्ये शिंदे-फडणवीसांच्या पुतळ्याचे दहन
तो स्वत:वर दबाव बनवत आहे. त्याला स्वत:ला जागृत करण्याची गरज आहे. त्याला टिच्चून खेळावे लागेल. तो प्रत्येक वेळेस आपली विकेट बक्षीस देतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामने बुधवारी खेळवला जाणार आहे.