video viral: लाईव्ह मॅच खेळताना खेळाडूचा मृत्यू, पाहा कुठे घडलीये घटना

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 27, 2022 | 15:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

kabaddi player death Viral Video:तामिळनाडूमध्ये लाईव्ह कबड्डी सामन्यादरम्यान हादरवून टाकणारी घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

kabaddi player death
लाईव्ह मॅच खेळताना खेळाडूचा मृत्यू, पाहा कुठे घडलीये घटना 
थोडं पण कामाचं
  • गावात कबड्डी सामन्यादरम्यान झाला अपघात
  • लाईव्ह सामन्यात झाला खेळाडूचा मृत्यू
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मुंबई: तामिळनाडूच्या(tamilnadu) पनरूतीमध्ये एका कबड्डी खेळाडूचा(kabaddi player) दुर्देवी मृत्यू(death) झाला.. या खेळाडूचा मृत्यू लाईव्ह सामन्यादरम्यान झाला. हा अपघात रविवारी २४ जुलैला झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मृत खेळाडूचे नाव विमलराज(vimalraj) आहे आणि त्याचे वय २२ वर्षे होते. विमलराज सालेम येथे राहणारा होता. तो बीएससीचे शिक्षण घेत होता. पोलिसांनी या प्रकरणी केस दाखल केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. (Kabaddi player death due to heart attack at live match )

अधिक वाचा - तुमच्या खिशातील २०० रुपयांची नोट नकली तर नाहीये ना? 

स्वत:ला वाचवण्याचा करत होता प्रयत्न

विमलराज विरोधी संघामध्ये रेड टाकण्यासाठी गेला होता. यावेळी विरोधी संघाच्या खेळाडूंनी त्याला घेरले. अशातच विमलराजने तेथून स्वत:ला वाचवण्यासाठी जोरात उडी टाकली आणि तो मैदानावर पडला. यानंतर विमलाराजने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी एका खेळाडूचा पाय त्याच्या छातीवर लागला. त्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठू शकला नाही आणि तो खाली पडला. विमलराजला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

असं मानलं जात आहे की कबड्डी खेळाडूचा मृत्यू हार्ट अॅटॅकमुळे झाले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमनंतर कुटुंबियांकडे सोपवला. त्याच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. सोबतच त्याने जिंकलेली ट्रॉफीही पुरण्यात आली. धक्कादायक म्हणजे विमलराजच्या आधी बंगळुरूमध्ये एका किक बॉक्सरचा लाईव्ह सामन्यात दुखापत झाल्यानंतर मृत्यू झाला होता. स्टेट लेव्हल किक बॉक्सिंग स्पर्धेत निखिल सुरेश दुखापतग्रस्त झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.  

परिसरात शोककळा

या दुर्घटनेनंतर तेथील परिसरात शोककळा पसरली आहे. विमलच्या मृत्यूनंतर त्याच्या घरच्यांचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यात विमलचा मृतदेह पुरताना त्याच्यासोबत त्याने जिंकलेली ट्रॉफीही पुरली जात आहे. 

अधिक वाचा - सपना चौधरीचं गाणं 'Kaamini' रिलीज, सोशल मीडियावर धुमाकूळ

पोलिसांनी प्रकरणात केस केली दाखल

रुग्णालयात डॉक्टरांनी विमलला मृत घोषित केल्यानंतर पोलिसांनीही या प्रकरणात केस दाखल केली. विमलराज दुर्घटनेप्रकरणी पोलीस तपास करत आहे. ही हत्या तर नाही ना याचा तपास पोलीस करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी