Pro Kabbadi League: हा कबड्डीपटू डेव्हिड मलान, ऋतुराज गायकवाड या आयपीएल खेळाडूंपेक्षाही जास्त घेतो मानधन

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 09, 2022 | 17:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

IPL 2022 and pro kabbadi league | एकीकडे आयपीएल २०२२ आगामी १५ व्या हंगामाकडे कूच करत आहे, तर प्रो कबड्डी लीगचा उत्साहही वाढत चालला आहे. आयपीएल प्रणाणेच प्रो कबड्डी लीगचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. दरम्यान आयपीएल मधील खेळाडू मानधनाच्या बाबतीत करोडोच्या घरात आहेत त्यांची एका हंगामातील कमाई करोडोंमध्ये आहे.

Kabaddi player Pradeep Narwal earns money more than IPL player David Malan Ruturaj Gaikwad and Devdutt Padikkal
हा कबड्डीपटू आयपीएलमधील स्टार खेळाडूंहून अधिक घेतो मानधन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयपीएल प्रणाणेच प्रो कबड्डी लीगचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे.
  • मानधनाच्या बाबतीत कबड्डीपटू खेळाडू देखील स्टार आयपीएल खेळाडूंवर भारी आहे. यामध्ये प्रो कबड्डी लीगमध्ये डुबकी किंग नावाने प्रसिध्द असलेल्या प्रदीप नरवालचे नाव अग्रस्थानी घेतले जाते.
  • देवदत्त पडिक्कल, हर्षल पटेल आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंची मागच्या वेळी म्हणजेच आयपीएल २०२१ मध्ये २० लाख रुपयांना विक्री झाली होती. त्याचवेळी प्रदीप नरवालला यूपी योद्धाने १.६५ कोटी रुपयांना खरेदी केले.

IPL 2022 and pro kabbadi league | नवी दिल्ली : एकीकडे आयपीएल २०२२ आगामी १५ व्या हंगामाकडे कूच करत आहे, तर प्रो कबड्डी लीगचा उत्साहही वाढत चालला आहे. आयपीएल प्रणाणेच प्रो कबड्डी लीगचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. दरम्यान आयपीएल मधील खेळाडू मानधनाच्या बाबतीत करोडोच्या घरात आहेत त्यांची एका हंगामातील कमाई करोडोंमध्ये आहे. लक्षणीय बाब म्हणजे हे पूर्ण जगजाहीर आहे मात्र मानधनाच्या बाबतीत कबड्डीपटू खेळाडू देखील स्टार आयपीएल खेळाडूंवर भारी आहे. यामध्ये प्रो कबड्डी लीगमध्ये डुबकी किंग नावाने प्रसिध्द असलेल्या प्रदीप नरवालचे (Pradeep Narwal) नाव अग्रस्थानी घेतले जाते. प्रो कबड्डी लीगमध्ये यूपी योद्धा संघाकडून खेळणारा हा स्टार खेळाडू सध्या चर्चेत आहे. अलीकडेच प्रदीप नरवालने प्रो कबड्डी लीगच्या सामन्यात १२०० रेड पॉइंटस पूर्ण केले. कबड्डी लीगच्या इतिहासात इतके गुण मिळवणारा प्रदीप हा पहिलाच खेळाडू बनला आहे. (Kabaddi player Pradeep Narwal earns money more than IPL player David Malan Ruturaj Gaikwad and Devdutt Padikkal)


प्रदीपने १२०० पॉइंटस मिळवण्याचा विक्रम यूपी योद्धा आणि तमिळ थलायवास यांच्यातील सामन्यात केला. याशिवाय प्रदीपची आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे तो इतर कबड्डीपटूंपेक्षाच नाही तर कित्येक स्टार आयपीएल खेळाडूंपेक्षाही जास्त मानधन घेणारा खेळाडू ठरला आहे. देवदत्त पडिक्कल, हर्षल पटेल आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंची मागच्या वेळी म्हणजेच आयपीएल २०२१ मध्ये २० लाख रुपयांना विक्री झाली होती. त्याचवेळी प्रदीप नरवालला यूपी योद्धाने १.६५ कोटी रुपयांना खरेदी केले. यावेळी प्रो कबड्डी लीगमध्ये प्रदीप ज्या प्रकारची कामगिरी करत आहे, त्यामुळे त्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, इतकंच नाही तर डेव्हिड मलानसारखा स्टार खेळाडू आयपीएल २०२१ मध्ये १.५० कोटींमध्ये विकला गेला होता आणि आयपीएल २०२१ मध्ये जिमी निशम ५० लाखांना विकला गेला होता. तर बेन कटिंगला ७५ लाखांचे मानधन मिळाले होते. अशा परिस्थितीत कबड्डीतील खेळाडूची १.६५ कोटी रुपयांना विक्री होणे ही मोठी गोष्ट मानली जात आहे. प्रदीप नरवालला डुबकी किंग नावाने देखील ओळखले जाते. तो सध्या सुरू असलेल्या प्रो कबड्डी हंगामातील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. प्रो कबड्डी लीगची सुरूवात २०१४ मध्ये झाली होती. कोरोनाच्या कारणास्तव गतवर्षी या स्पर्धेचे आयोजन झाले नव्हते. मात्र यंदाचा हंगाम सध्या बंगळुरूमध्ये होत आहे.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी