Kapil Dev On Political Entry | मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराउंडर कपिल देव सध्या खूप चर्चेत आहेत. कारण म्हणजे राजकारण. अलीकडे कपिल देव राजकारणात येणार अशा चर्चांनी जोर धरला होता. तसेच ते लवकरच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता खुद्द कपिल देव यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (Kapil Dev puts an end to discussion on entering politics).
अधिक वाचा : आता तुम्ही 10 मिनिटांत ई-पॅन कार्ड PDF करू शकता डाउनलोड
दरम्यान, एवढेच नाही तर कपिल देव आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीचा फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. तसेच माजी भारतीय खेळाडू कपिल देव यांनी हे सर्व वृत्त फेटाळून लावले आणि या प्रकरणाबद्दल ते खूप निराश दिसून आले.
अधिक वाचा : संभाजीराजे छत्रपतींनी नाकारली शिवसेनेची अट वाली ऑफर
लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू कपिल देव हे राजकारणात जाणार या अफवांमुळे ते खूप नाराज आहेत. त्यांनी लोकांद्वारे पसरवल्या गेलेल्या या बातमीला पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले. कपिल देव यांनी सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकून ही माहिती दिली.
"मला नुकतीच मी एका राजकीय पक्षात सामील झाल्याची बातमी मिळाली आहे. हे पूर्णपणे असत्य आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. लोक खोट्या बातम्या पसरवतात याबद्दल मी खूप निराश आहे. निश्चित राहा, मला कधी एवढे मोठे पाऊल उचलावे लागले तर त्याची मी जाहीरपणे घोषणा करेन."
कपिल देव हे भारतीय क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार आहेत, ज्यांनी संघाला विश्वचषक जिंकून दिला. १९८३ मध्ये भारताने विश्वचषकातील आक्रमक मानल्या जाणार्या वेस्ट इंडिजचा ४३ धावांनी पराभव केला. याशिवाय भारत जेव्हा विश्वचषक खेळायला गेला तेव्हा १९८३ मध्ये संघ विश्वचषकातील एकतरी सामना जिंकेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. पण कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील संघ वेगळ्याच अवतारात दिसला.