virat kohli: विराटच्या सिलेक्शनवर कपिलने केले सवाल, रोहितने दिले हे उत्तर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 11, 2022 | 14:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rohit Sharma replies on Virat Kohli critics: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कपिल देवसह त्या टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे ज्यांनी विराट कोहलीच्या टीम इंडियातील निवडीवर सवाल उपस्थित केले. 

kohli and rohit
विराटच्या सिलेक्शनवर कपिलने केले सवाल, रोहितने दिले हे उत्तर 
थोडं पण कामाचं
  • रोहित शर्माने विराट कोहलीच्या टीकाकारांना दिले उत्तर
  • कपिल देवने विराट कोहलीच्या निवडीवर केले सवाल
  • मायकेल वॉननेही विराट कोहलीवर केली टीका

मुंबई: भारताचा कर्णधार रोहित शर्माने(team india captain rohit sharma) टी-२० सामन्यात विराट कोहलीच्या(virat kohli place) स्थानार सवाल उपस्थित करणाऱ्या तज्ञांवर निशाणा साधताना म्हटले की या स्टार फलंदाजाच्या स्तराबाबत संशय व्यक्त केला जाऊ शकत नाही. टीम मॅनेजमेंटचा सपोर्ट कायम राहील. नोव्हेंबर २०१९ नंर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक ठोकण्यात असमर्थ असलेला कोहली इंग्लंडविरुद्ध टी-२०मध्येही आपली छाप सोडण्यास अयशस्वी ठरला. kapil dev question on kohli selection, rohit gives this answer

अधिक वाचा - मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

खेळाच्या सर्व प्रकारातून कोहलीच्या फॉर्मवर सवाल केले जात आहेत. त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच महिन्यांनी पुनरागमन केले होते. कोहलीच्या अनुपस्थितीत दीपर हुड्डासारख्या खेळाडूंना संधी मिाली ज्याने त्याचा पूर्ण फायदा घेतला. आयर्लंडविरुद्धची मालिका आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात शानदार कामगिरी केली असतानाही हुड्डाला कोहलीच्या पुनरागमनानंतर अंतिम ११मध्ये स्थान मिळाले नाही. 

भारताचे वर्ल्डकप विजेते माजी कर्णधार कपिल देव आणि इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉनसारख्या तज्ञांनी कोहलीच्या दीर्घकाळापासून असलेल्या खराब फॉर्मवर चर्चा केली. रविवारी तिसऱ्या टी-२० नंतर प्रेसशी बोलताना रोहितने सांगितले की तज्ञांना माहीत नाही की संघात काय होत आहे. टीम कोहलीच्या फॉर्मकडे कशी पाह आहे हे विचारल्यावर रोहित म्हणाला, हे आमच्यासाठी अजिबात कठीण नाही कारण बाहेर काय गोष्टी सुरू आहेत यावर आम्ही लक्ष देत नाही. मला नाही माहीत की हे कोण तज्ञ आहेत आणि त्यांना तज्ञ का म्हटले जाते. मला खरंच समजत नाही. 

कपिलने म्हटले की खेळाडूंना प्रतिष्ठेच्या आधारावर निवडले गेले जाऊ नये आणि खेळाडूंची निवड सध्याच्या फॉर्मच्या आधारावर केली जावी. वॉनने कोहलीला खेळातून तीन महिन्यांचा ब्रेक घेण्याचा सल्ला दिला होता. रोहितने सांगितले, ते गोष्टी बाहेरून बघतात मात्र त्यांना माहीत नाही की संघात काय सुरू आहे. आमची विचार करण्याची एक प्रक्रिया आहे, आम्ही टीम बनवतो, आम्ही वाद करतो आणि चर्चा करतो. तसेच याबाबत खूप विचार करतो. 

ज्या खेळाडूंना आम्ही निवडतो त्याला पाठिंबा देतो. त्यांना संधी दिली जाते. बाहेरच्या लोकांना याबाबत काही माहीत नाही. यासाठी टीममध्ये काय सुरू आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.. कोहलीच्या नावावर ७० आंतरराष्ट्रीय शतके आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्य त्याच्यापेक्षा जास्त सर्वाधिक शतक रिकी पॉटिंग(७१) आणि सचिन तेंडुलकर(१००) यांच्याच नावावर आहेत. 

अधिक वाचा - मजबूत डॉलरमुळे सोन्याच्या भावात किंचित घसरण

सोबतच तुम्ही जर फॉर्मचा विचार केला तर सगळ्यांच्याच फॉर्ममध्ये चढ-उतार येतात. खेळाडूंचा स्तर खराब होत नाही. या पद्धतीची विधाने करताना नेहमी लक्ष द्या. रोहित पुढे म्हणाला, असे माझ्यासोबतही झाले, असे कोणासोबतही होऊ शकते. यात नवे काही नाही. जर एखाद्या खेळाडूने सातत्याने इतके चांगले केले असेल तर ते एखाद दोन मालिकेतील खराब कामगिरीमुळे त्याचे योगदान विसरू शकत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी