ICC World Cup 2019: केदार जाधवने तोडला जसप्रित बुमराजचा मोठा रेकॉर्ड... 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 06, 2019 | 16:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICC World Cup 2019: कालच्या विजयचा सर्वाधिक मोठा फायदा हा केदार जाधवला मिळाला आहे. त्याने एक अनोखा विक्रम केला आहे. त्याने जसप्रित बुमराहचा विक्रम तोडला आहे. 

kedar jadhav
केदार जाधव 

लंडन : टीम इंडियाने बुधवारी वर्ल्ड कप २०१९ मध्ये आपल्या विजयी अभियानाला सुरूवात केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर १५ चेंडू आणि सहा विकेटने मात केली. टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले रोहित शर्मा (122*), युजवेंद्र चहल (४ विकेट) आणि जसप्रित बुमरा ( २ विकेट)  याच्या शानदार कामगिरीमुळे मेन इन ब्ल्यू ने स्पर्धेची शानदार सुरूवात केली. 

दरम्यान, या विजयाचा सर्वाधिक फायदा हा केदार जाधवला मिळाला आहे. त्याने एक अनोखा रेकॉर्ड बनविला आहे. त्याने हा विक्रम करून जसप्रित बुमराहचा विक्रम तोडला आहे. केदारची कामगिरी या सामन्यात जेमतेम राहिली. त्याने चार ओव्हर्समध्ये १६ धावा देत एकही फलंदाज बाद केला नाही. तर फलंदाजीची त्याला संधी मिळाली नाही. पण तरीही त्याच्या नावावर एक खास विक्रम नोंदविला गेला. चला पाहू या केदार जाधवने आपल्या नावावर कोणता विक्रम केला, की ज्यामुळे त्याने जसप्रित बुमराहला मागे टाकले. 

भारतीय खेळाडूंमध्ये पहिल्या ५० सामन्यात सर्वाधिक विजय मिळविलेल्या टीमचा सदस्य होण्याचा मान केदार जाधवला गेला आहे. तो या यादीत पहिल्या क्रमांगावर गेला आहे. केदारने आतापर्यंत ५० वन डे सामने खेळले त्यात भारतीय संघाने ४० सामने जिंकले आहेत. जाधवने बुमराहला या बाबतीत मागे टाकले आहे. बुमराहने खेळलेल्या पहिल्या ५० सामन्यात भारताला ३९ सामन्यात यश मिळाले आहे. आकड्यांवर नजर टाकली तर हे म्हणणे चुकीचे नाही ठरणार की केदार जाधव हा टीम इंडियासाठी लकी चार्म आहे. 

या यादीत पहिल्या ५० सामन्यात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघाचा सदस्य म्हणून तिसरा क्रमांक लागतो तो अंबाती रायडू याचा. अंबाती रायडू ज्या संघात होता, त्याने ५० पैकी ३५ सामने जिंकले आहेत. चौथ्या क्रमांकावर प्रविण कुमार यांचा नंबर लागतो, त्याच्या ५० सामन्यात ३४ सामने भारताने जिंकले आहे. युसूफ पठाण हा पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्या ५० वन डेमध्ये भारताने ३३ सामने जिंकले आहेत. 

पाच जणांनी यादी 

  1. केदार जाधव -  ५० सामने - ४० सामन्यात विजय 
  2. जसप्रित बुमराह -  ५० सामने - ३९ सामन्यात विजय 
  3. अंबाती रायडू -  ५० सामने - ३५ सामन्यात विजय
  4. प्रविण कुमार -  ५० सामने - ३४ सामन्यात विजय 
  5. युसूफ पठाण  ५० सामने - ३३ सामन्यात विजय   

 

केदार जाधव यांच्या फिटनेसबाबत शंका निर्माण झाली होती. त्यामुळे तो वर्ल्ड कपमध्ये खेळतो की नाही याबाबत सस्पेन्स कायम होता. जाधव याला आयपीएलमध्ये खांद्याला दुखापत झाली होती.  त्यानंतर तो प्लेऑफमधून बाहेर पडला होता. तसेच वर्ल्ड कपपूर्वीच्या दोन सराव सामन्यात तो खेळला नव्हता. आता तो फीट असून भारताला खिताब देण्यासाठी आपला पूर्ण जोर लावताना दिसत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ICC World Cup 2019: केदार जाधवने तोडला जसप्रित बुमराजचा मोठा रेकॉर्ड...  Description: ICC World Cup 2019: कालच्या विजयचा सर्वाधिक मोठा फायदा हा केदार जाधवला मिळाला आहे. त्याने एक अनोखा विक्रम केला आहे. त्याने जसप्रित बुमराहचा विक्रम तोडला आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola