South Africa Cricketer: हनुमानाचा भक्त आहे स्टार दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू,  UPशी आहे नाते

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 20, 2022 | 18:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

South Africa Team:दक्षिण आफ्रिकेचा एक स्टार क्रिकेटर हनुमानाचा भक्त आहे आणि त्याचे उत्तर प्रदेशशी नाते आहे. हा खेळाडू आपल्या जादुई गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. 

keshav maharaj
हनुमानाचा भक्त आहे स्टार दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू,  UPशी नाते 
थोडं पण कामाचं
  • भारतीय वंशाचा केशव महाराज दक्षिण आफ्रिकेत राहतो आणि तेथून क्रिकेट खेळतो.
  • मात्र तो आफ्रिकेत राहत असला तरी सगळे हिंदू प्रथा पाळतो आणि हनुमानाचा मोठा भक्त आहे
  • केशव महाराजाचे पूर्वज १८७४मध्ये भारतातून डरबनमध्ये नोकरीच्या शोधात आले होते

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात(india vs south africa) ५ टी-२० सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला. पाचव्या टी-२० सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केवश महाराज होता. केशव महाराजचे उत्तर प्रदेशशी नाते आहे आणि तो हनुमानाचा भक्त आहे.keshav maharaj is devotee of hanuman, connectiion with UP

अधिक वाचा - प्रियकरासोबत सापडलेल्या पत्नीचा पतीने केला खून

उत्तर प्रदेशशी आहे नाते

भारतीय वंशाचा केशव महाराज दक्षिण आफ्रिकेत राहतो आणि तेथून क्रिकेट खेळतो. मात्र तो आफ्रिकेत राहत असला तरी सगळे हिंदू प्रथा पाळतो आणि हनुमानाचा मोठा भक्त आहे. केशव महाराजाचे पूर्वज १८७४मध्ये भारतातून डरबनमध्ये नोकरीच्या शोधात आले होते आणि तेथेच स्थायिक झाले. केशव महाराजाचे पूर्वज उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर जिल्ह्यात राहणारे होते. 

द. आफ्रिकेत झाला जन्म

यावर्षी जानेवारीमध्ये जेव्हा भारतीय संघाला आफ्रिकेच्या हातून ३-० असा पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा त्याने सोशल मीडियावर जय श्री राम असे लिहिले होते. हिंदू संस्कृती फॉलो करत असल्यामुळे केशव महाराज सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. केशव महाराजचा जन्म ७ फेब्रुवारी १९९०मध्ये आफ्रिकेत झाला होता. केशव महाराजचे वडील दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेट खेळले आहेत. 

आफ्रिकेसाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळले

केशव महाराजने आफ्रिकेसाठी तीनही फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आफ्रिकेसाठी ४२ कसोटी सामन्यांत १५० विकेट, २१ वनडे सामन्यांत २६ विकेट आणि ९ टी२० सामन्यांत ७ विकेट घेतले आहेत. तो आपल्या धोकादायक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे बॉल समजणे हे फलंदाजांसाठी नेहमीच कठीण राहिले आहे. 

अधिक वाचा - एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या

बरोबरीत सुटली मालिका

दक्षिण आफ्रिका संघाने भारताविरुद्धच्या दोन सामन्यात शानदार खेळ केला. मात्र त्यानंतर टीम इंडियाने पुनरागमन करताना सलग २ सामने जिंकत मालिका २-२ अशी रोखली. दक्षिण आफ्रिकेसाठी डेविड मिलर, हेनरिक क्लासेन आणि क्विंटन डी कॉकने चांगला खेळ केला.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी