IPL 2023: खलील अहमदने रचला LSG विरुद्ध इतिहास, IPL मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला गोलंदाज

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 02, 2023 | 17:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Khaleel Ahmed Completed IPL 50 Wickets, LSG vs DC। 1 एप्रिलला आयपीएल 2023 च्या तिसऱ्या सामन्यात, लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा (LSG vs DC) 50 धावांनी पराभव करत यंदाच्या सीजनची धमकेदार सुरुवात केली. असे असले तरी, पराभूत दिल्ली संघाचा वेगवान गोलंदाज खलील अहमदसाठी हा सामना काही कारणास्तव खास ठरला. त्याने, या सामन्याद्वारे आयपीएलच्या इतिहासात आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला आहे.

LSG vs DC:लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 50 धावांनी पराभव केला
खालील अहमद ठरला IPL मध्ये सर्वात वेगवान 50 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या सामन्याद्वारे आयपीएलच्या इतिहासात आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला आहे.
  • आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 50 बळी घेण्याच्या बाबतीत खलीलने अमित मिश्रा, मोहित शर्मा, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा आणि आरपी सिंग यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. 
  • LSG vs DC:लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 50 धावांनी पराभव केला

Khaleel Ahmed Completed IPL 50 Wickets लखनऊ सुपर जायंट विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या शनिवारच्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सला पराभव पत्करावा लागला असला तरी दिल्ली संघाचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने आयपीएलमध्ये आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला आहे. खाली अहमद ने आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान 50 बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनण्याचा मान पटकावला आहे. हा विक्रम करताना त्याने अनेक दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले आहे. (Khaleel Ahmed Completed 50 IPL wickets becomes fastest 50 wicket by indian bowler in ipl history). 

अधिक वाचा : ​मुंबई आणि कोकणात एप्रिल महिन्यात येणार उष्णतेची लाट

दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या या हंगामातील पहिल्या सामन्यात 2 बळी घेतले. त्याने 4 षटकात 30 धावा देत दोन विकेट्स पटकावल्या. त्यानुक्रमे खलीलने आयपीएलमधील त्याच्या एकंदरीत 35 सामन्यात एकूण 50 विकेट पूर्ण केल्या आहेत. असा विक्रम करणारा खालील हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला असून, त्याने यामध्ये अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे.  आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 50 बळी घेण्याच्या बाबतीत त्याने अमित मिश्रा, मोहित शर्मा, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा आणि आरपी सिंग यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. 

IPL मध्ये सर्वात वेगवान 50 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज

35 वा सामना - खलील अहमद
37 वा सामना - अमित मिश्रा
39 वा सामना - मोहित शर्मा
40 वा सामना - युझवेंद्र चहल
40 वा सामना - संदीप शर्मा
40वा सामना - आरपी सिंग

अधिक वाचा : ​तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल, येथे जाणून घ्या

IPL मध्ये सर्वात वेगवान 50 विकेट घेणार्‍या गोलंदाजांची यादी

कागिसो रबाडा - २७
सुनील नरेन - ३२
लसिथ मलिंगा - ३३
इम्रान ताहिर - 35
खलील अहमद-35          

LSG vs DC:लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 50 धावांनी पराभव केला

आयपीएल 2023 च्या तिसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्स संघाचा 50 धावांनी पराभव केला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाने निर्धारित 20 षटकांत एकूण 193 धावा केल्या. त्या तुलनेमध्ये दिल्ली कॅपिटल्सला केवळ 143 धावा करता आल्या.     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी