VIDEO: क्रिकेटप्रेमींनो तुम्ही 'हा' छोटा शिखर धवन पाहिला का?

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 12, 2019 | 13:51 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Cricket fever: ट्विटरवर शेअर झालेल्या एका व्हिडिओमध्ये लहान मुलगा अतिशय कौशल्याने नेटमध्ये बॅटिंग करताना दिसत आहे. त्यानं सरळ बॅटनं मारलेले काही शॉट्स बड्या बड्या क्रिकेटपटूंना तोंडात बोट घालायला लावणारे आहेत.

Cricket batting chotu
या पोराची बॅटिंग, तुम्हाला करेल थक्क  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली: क्रिकेट वर्ल्ड कप लंडनमध्ये सुरू आहे. पण, भारतात क्रिकेटचा ज्वर शिगेला पोहोचलाय. भारताच्या टीमनं पहिल्या दोन्ही मॅच जिंकून अतिशय चांगली सुरुवात केलीय. त्यामुळं क्रिकेट चाहत्यांचाही उत्साह वाढलाय. पहावं तिकडं क्रिकेटचीच चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियाही त्याला अपवाद नाही. सोशल मीडियावर मिम्सपासून अनेक गोष्टी व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हायरलमध्ये मात्र एका चिमुरड्याचा व्हिडिओ सगळ्यांत जास्त लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ट्विटरवर शेअर झालेल्या या व्हिडिओमध्ये लहान मुलगा अतिशय कौशल्याने नेटमध्ये बॅटिंग करताना दिसत आहे. त्यानं सरळ बॅटनं मारलेले काही शॉट्स बड्या बड्या क्रिकेटपटूंना तोंडात बोट घालायला लावणारे आहेत. हा व्हिडिओ पाहिला तर, त्याची बॅटिंग अशीच पाहत रहावी, असं वाटतंय.

पाहा व्हिडिओ

भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नाही तर तो धर्म मानला जातो. कोणत्याही विषयावर मतभेद असणारे क्रिकटेच्या विषयावर मात्र एकत्र येताना दिसतात. देशात क्रिकेटची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत शिगेला पोहोचली आहे. प्रत्येकाला टीम इंडियाचा भाग व्हायचंय. आई-वडीलही मुलांमध्ये क्रिकेटर पाहू लागले आहेत. त्यामुळंच छोट्या छोट्या शहरांमध्ये क्रिकेट अकॅडमी सुरू झाल्या असून, त्यात लहान लहान मुलं प्रशिक्षण घेताना दिसत आहेत. लहान वयात या मुलांना क्रिकेटचे धडे गिरवायला दिले जात आहेत. दुसरीकडे सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी आता सगळ्यांपर्यंत वेगानं पोहोचू लागल्या आहेत. हा मीडिया एखाद्याला एका रात्रीत सूपरस्टार करताना दिसत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडयावर धुमाकूळ घालत आहे. त्यात एक लहान मुलगा बॅटिंग करताना दिसत आहे. त्याचे शॉट्स बघत राहण्यासारखे आहेत. त्याची बॅटिंग पाहिली तर, त्याचं कौतुक केल्यावाचून आपण पुढं निश्चित जाणार नाही. हा व्हिडिओ कुठला आहे आणि या मुलाचे नाव काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

म्हणे शिखर धवनच्या जागी याला घ्या

बँटिंग करणारा चिमुकला डावखुरा आहे. सरळ बॅटनं तो जोरदार शॉट्स मारताना दिसत आहे. स्टेप आऊट होऊन त्यानं ताही शॉट्स मारले आहेत ते ही कौतुकास्पद आहे. त्याच्यासारखी बॅटिंग मोठ्यावयाचे काही खेळाडू करू शकणार नाहीत. सध्या भारताचा सलामीवीर शिखर धवन बोटाच्या फ्रॅक्चरमुळे संघाबाहेर राहणार आहे. त्याच्या जागी सलामीला कोण येणार? याची चर्चा सध्या सुरू आहे. तो संदर्भ घेत काहींनी व्हिडिओला कमेंट देताना ‘शिखरच्या जागी याला टीममध्ये घ्या,’ अशी कमेंट केली आहे. अर्थात तो थट्टेचा भाग आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी