T20 World Cup: किंग कोहलीची कमाल, टी20 वर्ल्ड कपमध्ये केला असा रेकॉर्ड की...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 27, 2022 | 15:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli:टीम इंडियाचा धुरंधर फलंदाज विराट कोहलीने मोठी कमाल करताना टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात एक विराट रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. शानदार फॉर्मात असलेल्या विराटने सलग दुसरे शतक ठोकले. 

virat kohli
किंग कोहलीची कमाल, टी20 वर्ल्ड कपमध्ये केला असा रेकॉर्ड की.. 
थोडं पण कामाचं
  • विराट कोहलीने नेदरलँड्सविरुद्ध नाबाद 62 धावांची खेळी केली.
  • यासोबतच टी20 वर्ल्ड कपमध्ये दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
  • विराट कोहलीच्या नावावर आता टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात 989 धावा करण्याचा रेकॉर्ड बनला आहे.

मुंबई: भारताचा जबरदस्त फलंदाज विराट कोहली(virat kohli) टी20 वर्ल्ड कपमध्ये अतिशय फॉर्मात आहे. त्याने  टी20 वर्ल्ड कपच्या(T20 World Cup) इतिहासात एक विराट रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. शानदार फॉर्मात असलेल्या विराट कोहलीने नेदरलँड्सविरुद्ध टी20 वर्ल्ड कपच्या सामन्यात 44 बॉलमध्ये नाबाद 62 धावांची खेळी केली. king kohli became second highest run scorer in T20 World Cup

अधिक वाचा - ओयो रूममध्ये अशा प्रकारे शोधा छुपे कॅमेरे

यासोबतच विराट कोहली टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. विराट कोहलीने वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर क्रिस गेलचा रेकॉर्ड तोडत हे यश मिळवले. विराट कोहली जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा मोठ-मोठे रेकॉर्ड्स बनतात आणि तुटतात. विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. 

टी20 वर्ल्ड कपमध्ये केला हा विराट रेकॉर्ड

विराट कोहलीने नेदरलँड्सविरुद्ध नाबाद 62 धावांची खेळी केली. यासोबतच टी20 वर्ल्ड कपमध्ये दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. विराट कोहलीच्या नावावर आता टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात 989 धावा करण्याचा रेकॉर्ड बनला आहे. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा केल्याचा रेकॉर्ड सध्या श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटर महेला जयवर्धने यांच्या नावावर आहे. महेला जयवर्धनेने टी20 वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक 1016 धावा केल्यात. 

कोहलीने तोडला गेलचा रेकॉर्ड

विराट कोहलीने वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज क्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला आहे. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीने आता गेलला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे. तिसऱ्या स्थानावर 965 धावांसह वेस्ट इंडिजचा क्रिस गेल आहे. 

टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

1. महेला जयवर्धने (श्रीलंका) - 1016 रन

2. विराट कोहली (भारत) - 989 रन

3. क्रिस गेल (वेस्टइंडीज) - 965 रन

अधिक वाचा - असे दिसेल अयोध्येचे राम मंदिर

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

1. क्रिस गेल (वेस्टइंडीज) - 463 सामन्यांत 14562 रन

2. कीरोन पोलार्ड (वेस्टइंडीज) - 614 सामन्यांत 11915 धावा

3. शोएब मलिक (पाकिस्तान) - 481 सामन्यांत 11902 रन

4.विराट कोहली (भारत) - 355 सामन्यांत 11174 रन

5. डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) - 334 सामन्यांत 11052 रन 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी