WPL: Kiran Navgire Bats Viral : यूपीच्या विजयात चमकला 'MSD 07' ; काय आहे हे प्रकरण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Mar 06, 2023 | 14:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

UP Warriers : यूपी वॉरियर्सने डब्ल्यूपीएलमध्ये विजयासह सुरुवात केली आहे. गुजरात जायंट्सने यूपी  वॉरियर्जला जिंकण्यासाठी 170 रनचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याला एलिसा हेली टीमने 19.5 ओवर मध्ये मॅच जिंकली.  यूपी वॉरियर्जसाठी सगळ्यात जास्त 59 रन ग्रेस ह्ररिसने केले. त्यांना प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आले. 

Kiran Navgire Bats Viral : 'MSD 07' shines in UP's win
किरणने 43 चेंडूत 53 धावा केल्या  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • यूपी वॉरियर्सने डब्ल्यूपीएलमध्ये विजयासह सुरुवात केली
  • गुजरात जायंट्सने यूपी वॉरियर्जला जिंकण्यासाठी 170 रनचे लक्ष्य दिले
  • किरणने 43 चेंडूत 53 धावा केल्या

UP Warriers : महिला प्रीमियर लीग (Women's Premier League) 4 मार्चपासून सुरू झाली आहे. पहिल्या दोन दिवसांतच या लीगमधून इतकं काही पाहायला मिळालं की चाहते भारावून गेले. रविवारी झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्सचे संघ आमनेसामने होते. यूपी वॉरियर्सने डब्ल्यूपीएलमध्ये (WPL) विजयाने कप जिंकण्याच्या प्रवासाला सुरुवात केली.या सामन्यात सोलापूरची किरण नवगिरे खूप चर्चेत आली आहे. 

गुजरात जायंट्सने (Gujarat Giants) यूपी वॉरियर्जला जिंकण्यासाठी 170 रनचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याला एलिसा हेली टीमने 19.5 ओवर मध्ये मॅच जिंकली.  यूपी वॉरियर्जसाठी सगळ्यात जास्त 59 रन ग्रेस ह्ररिसने केले. त्यांना प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आले. परंतु  या सामन्यात सोलापूरची मुलगी किरण नवगिरे ही चर्चेत आली आहे. किरणची खेळी तर दमदार झाली. पण तिच्या खेळीपेक्षा तिच्या बॅटची चर्चा अधिक झाली.  

 ग्रेसनंतर महाराष्ट्राची खेळाडू किरण नवगिरे हिने सर्वाधिक धावा केल्या. किरणने 43 चेंडूत 53 धावा केल्या. तिने या सामन्यात 5 चौकार आणि 2 षटकार मारले. ज्या बॅटने या धावा केल्या होत्या त्यावर 'MSD 07' लिहिले होते. यावरून किरण 'थला'ची डाय हार्ट फॅन असल्याचे दिसून येते. मूळची सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून असलेली किरण नवगिरे हिला "महिला क्रिकेट मधील धोनी" या नावाने देखील ओळखले जात आहे. शेतकरी कुटुंबातून आलेली किरण हिला महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळता आलं नाही म्हणून तिने थेट नागालँड गाठलं. भाला फेक, शॉर्ट पट या खेळात उत्तम कामगिरी केल्यानंतर किरणने क्रिकेट मध्ये आपली किमया दाखवली.

WPL सुरू होण्यापूर्वी जिओ सिनेमाशी बोलताना किरण नवगिरे म्हणाले की, 'भारताने 2011 चा पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकला. मी 2011 मध्ये त्याला फॉलो करायला सुरुवात केली आणि मला माहितही नव्हते की महिला क्रिकेट असे काही आहे. मी माझ्या गावातील मुलांबरोबर खेळलो आणि मला ते आवडू लागले.

अधिक वाचा :रवींद्र जडेजाची 'लय भारी' कामगिरी, महारेकॉर्डसह रचला इतिहास

बॅट झाली व्हायरल 

किरण नवगिरे आहे धोनीचा फॅन किरण नवगिरेची बॅट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. किरणने WPL च्या पहिल्याच सामन्यात MSD 07 च्या बॅटने अर्धशतक झळकावले. किरणसाठी ही संस्मरणीय खेळी ठरली. क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर 27 वर्षीय किरण नवगिरेला गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यात यूपीकडून खेळण्याची संधी मिळाली. तिच्या बॅटवर प्रायोजकाचे नाव नव्हते. पण कॅमेऱ्याचे फोकस त्याच्या बॅटच्या जवळ गेल्यावर तिथे MSD 07 लिहिले होते. किरण नवगिरेने 43 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी केली. त्याचा स्ट्राइक रेट 123.26 होता. यामुळे तिला महिला क्रिकेट मधील धोनी" या नावाने देखील ओळखले जात आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल 16 मध्ये खेळताना दिसणार आहे. धोनी चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळतो. आजकाल तो खूप सराव करत आहे.   

अधिक वाचा :लायनने शेन वॉर्नचा विक्रम मोडला, बनला आशियाचा नवा 'विदेशी बादशाह'

किरण प्रभु नवगिरे महाराष्ट्राची असून ती 28 वर्षाची आहे. किरणने 10 सप्टेंबर 2022 साली टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय महिला क्रिकेट टीममध्ये पदार्पण केले होते. किरणचा पहिला सामना इंग्लंड विरुध्दचा होता. तिला 6 टी-20 सामन्यांमध्ये चारवेळा फलंदाजी करण्याची संधी मिळाली,  पण त्यात तिला आपली कमाल दाखवता आली नाही. तिला चार डावात केवळ 17 धावा करता आल्या. 

नाबाद 10 ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. पण डब्ल्यूपीएलच्या पहिल्या मोसमातील पहिल्याच सामन्यात किरण नवगिरेने शानदार खेळी करत आपले कौशल्य दाखवून दिले. नवगिरेने आपले अर्धशतक झळकावलेल्या बॅटवर 'MSD 07' असे लिहिले होते. किरण नवगिरे हे एमएसडीचे मोठे चाहती आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी