Team india: द. आफ्रिका मालिकेपूर्वी टीम इंडियाला दोन मोठे झटके

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 08, 2022 | 19:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

KL Rahul out of SA T20Is: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. रिपोर्ट्सनुसार कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर गेला आहे. त्यामुळे ऋषभ पंत आता नेतृत्व करणार आहे.

team india
द. आफ्रिका मालिकेपूर्वी टीम इंडियाला दोन मोठे झटके 
थोडं पण कामाचं
  • केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
  • ऋषभ पंत करणार भारतीय संघाचे नेतृत्व
  • भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिला सामना गुरूवारी

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका(india vs south africa) यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका(t-20 series) गुरूवारपासून सुरू होत आहे. मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. बीसीसीआयने दुजोरा दिला आहे की केएल राहुल(KL  Rahul) आणि डाव्या हाताचा स्पिनर कुलदीप यादव(kuldeep yadav) द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाहीत. बीसीसीआयने सोबतच सांगितले की ऋषभ पंत आगामी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. हार्दिक पांड्याला उप कर्णधार बनवण्यात आले आहे. KL Rahul and kuldeep yadav ruled out from south africa series

अधिक वाचा - 

बीसीसीआयने ट्वीट करत लोकेश राहुल आणि कुलदीप यादव खेळणार नसल्याची माहिती दिली. बीसीसीआयने ट्वट केले, लोकेश राहुल आणि कुलदीप यादव दुखापतीमुळे द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेतून बाहेर गेले आहे. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी एक विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला भारतीय संघाचा कर्णधार तसेच हार्दिक पांड्याला उप कर्णधार बनवले आहे. 

एकट्याच्या जीवावर जिंकून देऊ शकतो हा खेळाडूू

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या टी-२० मालिकेत तिसऱ्या स्थानावर गोलंाजीसाठी उतरणार ही पूर्ण शक्यता आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये श्रीलंकाविरुद्ध टी-२० मालिकेतही श्रेयस अय्र तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करण्यास उतरला होता. योगायोग म्हणजे श्रीलंकेविरुद्ध या टी-२० मालिकेतही विराट कोहलीला आराम दिला होता. श्रेयस अय्यरने त्या टी-२० मालिकेत मिळालेल्या संधीचा फायदा उचलत एकूण २०४ धावा ठोकल्या. श्रेयस अय्यरला त्या टी-२- मालिकेत मॅन ऑफ दी सीरिजचा अवॉर्ड मिळाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी