KL Rahul Record : भल्याभल्यांना जमलं नाही ते केएल राहुलने केलं, हरलेल्या मॅचमध्ये रचलं नवं रेकॉर्ड

भारताचा टी-20 मधील ओपनर केएल राहुलनं मोहालीतील सामन्यात एक नवा विक्रम आपल्या नावे केला.

KL Rahul Record
भल्याभल्यांना जमलं नाही ते केएल राहुलने केलं  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • केएल राहुलनं रचला नवा विक्रम
  • 58 इनिंगमध्ये केल्या 2000 धावा
  • हरलेल्या सामन्यातही रचला नवा विक्रम

KL Rahul Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यातील पहिला टी-20 सामना (T-20 match) मोहालीत (Mohali) खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियानं 200 पेक्षा जास्त धावा करूनदेखील 4 विकेट्सनी पराभव स्विकारावा लागला होता. या सामन्यात भलेही भारताचा पराभव झाला असला तरी भारतीय बॅट्समननी जोरदार बॅटिंग केली होती. भारताचा ओपनर केएल राहुलने (KL Rahul) आपल्या इनिंगने सर्वांचंच मन जिंकून घेतलं होतं. या सामन्यात केएल राहुलनं एक रेकॉर्डही स्वतःच्या नावे करून घेतलं आहे. हे असं रेकॉर्ड आहे जे भलेभले बॅट्समनही करू शकले नाहीत.

केएल राहुलची तुफानी खेळी

आशिया कप 2022 मध्ये केएल राहुल सुरुवातीपासूनच शांत होता. अनेकांनी त्याच्या खेळाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मात्र या एकाच खेळातून त्याने सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. केएल राहुलनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तुफानी खेळी केली. त्याने 35 चेंडूंचा सामना करत 157.14 च्या स्ट्राईक रेटने 55 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. 

हे रेकॉर्ड केलं नावावर

या इनिंगसह केएल राहुलनं टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 2000 धावा पूर्ण केल्या. त्याने 2016 साली भारतासाठी पहिली टी-20 मॅच खेळली होती. 2 हजार धावांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला 58 इनिंग खेळाव्या लागल्या. सर्वात वेगवान 2000 धावा करणाऱ्यांच्या यादीत केएल राहुलने तिसरं स्थान पटकावलं आहे. पाकिस्तानचा बाबर आजम आणि मोहम्मह रिजवान यांनी 52 इनिंगमध्ये तर विराट कोहलीने 56 इनिंगमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या होत्या.

केएल राहुलचं टी-20 करिअर

टी-20 फॉरमॅटमध्ये केएल राहुल हा भारताचा एक यशस्वी फलंदाज मानला जातो. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 62 सामने खेळले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत त्याने 39.67 च्या सरासरीने 2018 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट आहे 141.32. त्याच्या टी-20 करिअरमध्ये आतापर्यंत त्याने 18 अर्धशतकं आणि 2 शतकं झळकावली आहेत. मोहालीत त्याने केलेल्या खेळीपूर्वी त्याला प्लेइंग-11 मधून बाहेर काढण्याची मागणीदेखील काहीजणांकडून केली जात होती. मात्र आपल्या खेळीने त्यानं सर्वांची बोलती बंद केली आहे. 

अधिक वाचा - Legends League: भयंकर... मॅचच्याआधी ऑस्ट्रेलियन बोलरच्या रूमच्या समोर साप!

केएल राहुलकडून अपेक्षा

परिस्थितीनुसार आपल्या खेळीचा वेग बदलण्यात केएल राहुलचा हातखंडा आहे. टी-20 हा आक्रमक खेळप्रकार असला तरी प्रत्येकवेळी आक्रमक खेळी करण्याची गरज असेतच असं नाही. हवं तेव्हा आक्रमक आणि हवं तेव्हा शांत लयीत खेळणं हे केएल राहुलचं वैशिष्ट्य आहे. आपला ओपनर जोडीदार रोहित शर्माला साथ देण्यासाठी आपल्या खेळीत तो नेहमीच आवश्यक बदल करतो. रोहित शर्मा फॉर्ममध्ये असताना दुसऱ्या एंडला शांतपणे उभं राहून त्याच्या आक्रमक खेळीला साथ देण्याचं कामही केएल राहुलने अनेकदा केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी