IND vs SA: वनडे मालिकेतील पराभवाने केएल राहुल निराश, स्वत: सांगितली टीम इंडियाची कमकुवत बाजू

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 24, 2022 | 13:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs South Africa ODI Series : भारती क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-० असे हरवले. टीम इंडियाचे नेतृत्व करत असलेला ोकेश राहुल या कामगिरीने खूपच निराश झाला आहे. त्याने याबाबतच्या कारणांवर चर्चाही केली. 

india vs south africa
IND vs SA: वनडे मालिकेतील पराभवाने केएल राहुल निराश 
थोडं पण कामाचं
  • सलग तिसऱ्या वनडेत भारताचा पराभव
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका भारताने गमावली
  • केएल राहुल या पराभवामुळे निराश

मुंबई: भारताला दक्षिण आफ्रिकेच्या(india vs south africa oneday series) भूमीमध्ये ३ सामन्यांच्या मालिकेत ३-० असे पराभवास सामोरे जावे लागले. मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताला अवघ्या ४ धावांनी पराभव सहन करावा लागाल. टीमचे नेतृत्व करत असलेला केएल राहुल(kl rahul) या पराभवामुळे खूपच निराश आहे. त्याने सामन्यानंतर टीम इंडियाची(team india) कमजोरी सांगितली तसेच पराभवावर चर्चाही केली. राहुलच्या नावावर खराब रेकॉर्डचीही नोंद झाली. तो पहिला कर्णधार बनला आहे ज्याच्या नेतृत्व मालिकेतील तीनहीवनडे संघाला पराभव पत्करावा लागला. kl rahul feeling sad after third loss in one day match against south africa

केएल राहुल सामन्यानंतर म्हणाला, हे संपूर्ण स्पष्ट आहे की आम्ही कुठे चुकलो. यापासून मी कुठेही दूर पळत नाही आहे. अनेकदा आमच्या शॉटी निवड खराब होती. बॉलनेही आम्ही सातत्याने योग्य क्षेत्रात हिट करत नव्हतो. आम्ही मध्ये मध्ये चांगला खेळ केला मात्र दीर्घकाळापर्यंत विरोधी संघावर दबाव बनवू शकलो नाही. यासाठी खेळाडूंच्या प्रयत्नांना दोष देऊ शकत नाही. कौशल् आणि स्थिती समजून घेण्यासाठी कधीकधी आम्ही चुकतो. 

दक्षिण आफ्रिकाने या सामन्यात भारताला २८८ धावांचे लक्ष्य दिले. मात्र यजमान संघ २८३ धावांवर ऑलआऊट झाला आणि ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतासाठी शिखर धवन(६१) आणि विराट कोहली(६५) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. संघाचा स्कोर ११६ असताना बाद झाला. भारताचाी मध्यमफळी पुन्हा कोलमडली. पंतला खातेही खोलता आले नाही. श्रेयस अय्यर २६ आणि सूर्यकुमार यादवला ३९ धावा करता आल्या. दीपक चाहरने ५४ धावा ठोकताना काही आशा जागवल्या होत्या. त्याने ३४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार ठोकत अर्धशतकी खेळी केली मात्र तो बाद झाल्यानंतर शेवटचे २ फलंदाज १० धावाही करू शकले नाही. 

राहुलने यावेळी दीपकचे कौतुक करताना म्हटले, दीपकने आम्हाला सामना जिंकण्याची संधी दिली. खूप चांगल्या स्थितीत सामना नेला. फक्त निराशा ही आहे की आम्ही हरणाऱ्या पक्षात परतलो. आम्ही चांगले करू शकलो असतो. आमच्या संघात काही नवीन लोक आहेत. द. आफ्रिकेचा विकेटकीपर फलंदाज क्वींटन डी कॉक ने शतक ठोकले आणि १२४ धावांची खेळी केली. रासी वॅन डेर डुसैनसोबत त्याने शतकी भागीदारी केली. क्विंटनला मॅन ऑफ दी मॅच आणि प्लेयर ऑफ दी सीरिज म्हणून निवडण्यात आले. या मालिकेत खेळण्याबाबत म्हणाला, पिच बिल्कुल सपाट नव्हती. असा विकेट होता जेथे तुम्ही खूप वेळ थांबू शकत नाही मालिकेआधी संघात पुनरागमन केले आणि पार्लमध्ये एक आठवडा ट्रेनिंग केली. पहिल्या सामन्यात लय शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आता या सामन्यात स्वत:ला आणखी सुधारण्याचा प्रयत्न केला. आता दुसऱ्या वनडेत मी लय मिळवली. आता काही बाबांची कर्तव्ये करण्यासाठी घरी परतणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी