KL Rahulची विकेट घेतल्यावर भांडायला लागले द. आफ्रिकेचे खेळाडू

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 05, 2022 | 15:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ind vs SA 2nd Test, KL Rahul Wicket: सामन्याच्या दुसऱ्यादिवशी भारताचा कर्णधार लोकेश राहुल आणि द. आफ्रिका यांच्यात वाद पाहायला मिळाला. ही घटना खेळाच्या सत्राच्या शेवटच्या सत्रात घडली. 

lokesh rahul
KL Rahulची विकेट घेतल्यावर मैदानावर रंगला वाद 
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात सातव्या ओव्हरमध्ये मार्को जानेसन गोलंदाजी करत होता.
  • ओव्हरच्या पाचव्या बॉलवर राहुलच्या बॅटवर लागून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या अॅडेन मार्करमच्या हाती गेला.
  • द. आफ्रिकेच्या खेळाडूंनी विकेट घेतल्याचा जल्लोष सुरू केला.

मुंबई: भारत आणि दक्षिण अफ्रीका (Ind vs SA) यांच्यात कसोटी मालिकेतील (Test Series) दुसरा सामना जोहान्सबर्गमध्ये खेळवला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार लोकेश राहुल(KL Rahul) आणि द. आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये वाद पाहायला मिळाला. ही घटना दिवसाचा खेळ संपताना शेवटच्या सत्रात घडली. यावेळेस राहुल बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत होता. kl rahul heated exchange with south afrcican player 

खरंतर, टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात सातव्या ओव्हरमध्ये मार्को जानेसन गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या पाचव्या बॉलवर राहुलच्या बॅटवर लागून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या अॅडेन मार्करमच्या हाती गेला. द. आफ्रिकेच्या खेळाडूंनी विकेट घेतल्याचा जल्लोष सुरू कला. मात्र राहुल क्रीझवर उभा होता. यानंतर अपायर्सनी थर्ड अंपायरकडे निर्णय सांगितला. 

रिप्लेमध्ये पाहिले की बॉल ग्राऊंडला न लागला सरळ मार्करमच्या हाती गेला. यामुळे मैदानावरील अंपायरने सॉफ्ट सिग्नलच्या आधारावर राहुलला बाद घोषित केले. दरम्यान, राहुल यानंतरही थांबला आणि त्याचे द. आफ्रिकेशी वाजले. 

याआधी द. आफ्रिकेचा डाव २२९ धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून शार्दूल ठाकूरने जबरदस्त फलंदाजी करताना ७ विकेट घेतल्या. मोहम्मद शमीच्या खात्यात २ आणि जसप्रीत बुमराहच्या खात्यात १ विकेट आला. द. आफ्रिकेला पहिल्या डावाच्या आधारावर २७ धावांची आघाडी मिळाली. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात २ बाद ८५  धावा केल्या होत्या.

तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया १-० ने आघाडीवर आहे. सेंच्युरियनमध्ये खेळवल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेला ११३ धावांनी हरवले होते. टीम इंडियाकडे द. आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. तर जोहान्सबर्गमध्येही टीम इंडियाचा रेकॉर्ड शानदार राहिला आहे. येथे आतापर्यंत एकही कसोटी सामना हरलेला नाही. टीम इंडियाने जर जोहान्सबर्गमध्ये कसोटी जिंकली तर मालिकेत ते २-० अशी विजयी आघाडी घेतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी