IND vs NZ: पहिल्या कसोटीपूर्वी भारताला जबरदस्त झटका, हा धडाकेबाज फलंदाज जखमी, गेला टीम बाहेर 

KL Rahul ruled out of 1st test against New Zealand:भारतीय सलामीवीर केएल राहुल मंगळवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला. बीसीसीआयने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत जखमी भारतीय सलामीवीराच्या जागी सूर्यकुमार यादवला स्थान दिल्याची पुष्टी केली आहे.

kl rahul ruled out of test series with injury suryakumar yadav replaces indian opener
IND vs NZ: पहिल्या कसोटीपूर्वी भारताला जबरदस्त झटका 
थोडं पण कामाचं
  • केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला
  • बीसीसीआयने खुलासा केला की राहुलला डाव्या मांडीचा स्नायू दुखत आहे
  •  सूर्यकुमार यादव कसोटी मालिकेत केएल राहुलच्या जागी

KL Rahul ruled out of 1st test against New Zealand: गुरुवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर केएल राहुल मंगळवारी आगामी दोन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला. भारताचा सलामीवीर केएल राहुल दुखापतग्रस्त असून दोन्ही कसोटीत तो प्लेइंग 11 मध्ये नक्कीच दिसणार नाही. केएल राहुलला डाव्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली आहे.  त्यामुळे तो आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे पुष्टी केली आहे की केएल राहुलच्या जागी सूर्यकुमार यादव भारतीय कसोटी संघात स्थान घेणार आहे. यापूर्वी सूर्यकुमार यादवचाही इंग्लंड दौऱ्यावर कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी २५ नोव्हेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.

बीसीसीआयने दिलेल्या प्रसिद्ध पत्रकानुसार, पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी राहुलचे एनसीए (नॅशनल क्रिकेट अकादमी) येथे रिहॅबिलेटेशन होणार आहे. राहुलने भारतासाठी ४० कसोटी सामने खेळले आहेत. या 29 वर्षीय फलंदाजाच्या 35.16 च्या सरासरीने 2321 धावा आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 199 धावा आहे, जी त्याने 2016 मध्ये चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध केली होती.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, राहुल भारतीय संघाच्या सराव सामन्यात सहभागी झाला नव्हता. कानपूरमध्ये संघाच्या नेट सत्रादरम्यान शुभमन गिलने मयंक अग्रवालसह डावाची सुरुवात केली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शुभमन गिल ओपनिंगला फलंदाजीला येऊ शकतो, असे संकेतही चेतेश्वर पुजाराने दिले आहेत. कर्णधार विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यात सहभागी होऊ शकतो, असा खुलासा बीसीसीआयने यापूर्वी केला होता. श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव यांना कानपूरमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

भारताचा अपडेटेड कसोटी संघ: अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इंद्रकुमार शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी