T20 World Cup 2021मध्ये का खराब झाली टीम इंडियाची कामगिरी, ही आहेत ७ कारणे

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 08, 2021 | 16:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICC T20 World Cup 2021 मध्ये भारतीय संघाला पसंती होती मात्र पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाचे कोणी नावही घेतले नाही. 

team india
T20 World Cup 2021मध्ये का खराब झाली टीम इंडियाची कामगिरी 
थोडं पण कामाचं
  • जेव्हा भारताचा सामना पाकिस्तानविरुद्ध झाला तेव्हा भारतीय संघाची हालत खराब झाली
  • ज्या गोंलंदाजांच्या जोरावर भारतीय संघ फुशारक्या मारत होता त्यांनी काही केले नाही.
  • न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी यांची कामगिरी खूपच खराब झाली. 

दुबई: भारतीय संघ ICC T20 World Cup 2021 चा मजबूत दावेदार मानला जात होता. भारताने(india) आपल्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडला त दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिाला(australia) हरवले होते. दरम्यान,जेव्हा भारताचा सामना पाकिस्तानविरुद्ध झाला तेव्हा भारतीय संघाची हालत खराब झाली. ज्या गोंलंदाजांच्या जोरावर भारतीय संघ फुशारक्या मारत होता त्यांनी काही केले नाही. न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या जसप्रीत बुमराहने केवळ दोन विकेट घेतल्या. दरम्यान, अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडला भारताने एकतर्फी सामन्यात हरवले. मात्र हा विजय भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवण्यासाठी पुरेसा नव्हता. भारताला आशा होती की नामिबिया, स्कॉटलंड अथवा अफगाणिस्तान कोणीतरी न्यूझीलंडला हरवेल मात्र असे काही घडले नाही आणि टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर झाली. know 7 reasons why team india flop in T20 World Cup 2021

पहिले कारण

या स्पर्धेत पाकिस्तानी संघाने चॅम्पियनप्रमाणे सुरूवात केली आणि भारताला पहिल्याच सामन्यात १० विकेटनी पराभूत केले. त्यानंतर न्यूझीलंडने भारताला ८ विकेटनी हरवले. न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर जबरदस्त कामगिरी करत आपली सेमीफायनलमधील जागा पक्की केली. या दोघांपैकी एक सामना भारताने जिंकणे गरजेचे होते. 

डाव्या हाताच्या गोलंदाजांची कमी

यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये डाव्या हाताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र भारताकडे असा एकही गोलंदाज नव्हता. भारताकडे डाव्या हाताचा वेगवान गोलदाज नाही असे नाही मात्र त्यांना संधीच दिली नव्हती. 

पहिल्या दोन सामन्यात ढिसाळ गोलंदाजी

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये फलंदाजांनी थोडी इज्जत वाचवली मात्र गोलंदाजांनी खूप खराब कामगिरी केली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी यांची कामगिरी खूपच खराब झाली. 

वरूणवर खूप विश्वास

मिस्ट्री गोलंदाज वरूण चक्रवर्तीवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवला गेला. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने एकही विकेट घेतला नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला बाहेर ठेवण्यात ाले. मात्र पुन्हा स्कॉटलंडविरुद्ध त्याला विकेटचे खाता खोलता आले नाही. 

टीम सिलेक्शन योग्य नाही

पाकिस्तान आणि न्यूझीलंडसारख्या दिग्गज संघाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची निवड चुकीची ठरली. पहिल्या दोन सामन्यात अनुभवी स्पिनर रवीचंद्रन अश्विनला न खेळवणे ही मोठी चूक ठरली. त्यानंतरच्या दोन सामन्यात त्याला खेळवण्यात आले आणि त्याने सिद्ध करून दाखवले की तो अनुभवाच्या जोरावर टीम इंडियाला जिंकवू शकतो. 

विराटच्या नशिबाने दिला दगा

विराट कोहलीला या स्पर्धेत नशिबाने साथ दिली नाही. टॉस न जिंकणे ही त्यातील एक बाब. असेच काहीसे टी-२० वर्ल्डकपमध्ये पाहायला मिळाले. सुरूवातीचे तीनही टॉस त्याने गमावले. दुबईतील सामन्यांमध्ये टॉसची भूमिका महत्त्वाची होती. 

आयपीएलनंतर लगेचच मोठा इव्हेंट

आयपीएल २०२१चे दुसरे सत्र वर्ल्डकप सुरू होण्याच्या काही दिवस आधीच संपले. त्याने सतत बायो बबलमध्ये राहणे आणि स्पर्धेत पुरेसे अंतर नसल्याने क्रिकेटर्सना पुरेसा आरामही मिळाला नाही. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी