गयाना: वेस्ट इंडिजमध्ये(west indies) सुरू असलेल्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये(u19 world cup) खेळत असलेला भारताचा युवा क्रिकेटर हरनूर सिंह(harnor singh) आता क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनत चालला आहे. ३० जानेवारी २००३मध्ये पंजाबच्या जालंधरमध्ये जन्मलेल्या हरनूरचा संबंध क्रिकेट कुटुंबाशी झाला. त्यांच्या रक्तातच क्रिकेट आहे. भारतीय संघासाठी खेळणारा तो कुटुंबातील पहिला खेळाडू आहे. डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने लेग स्पिन गोलंदाजी करणारा हरनूर अंडर १९ वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात केवळ १ धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला होा. मात्र आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने आपला खरा रंग दाखवला आणि ८८ धावांची धमाकेदार खेळी केली. know all about harnoor singh who is playing in u19 team india
आयर्लंडविरुद्ध जरी त्याला शतक ठोकण्यात यश आले नाही मात्र त्याने पहिल्या विकेटाठी अंगक्रिश रघुवंशीसह १६४ धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. जेव्हहा तो बाद झाला तेव्हा संघाने ३४.४ ओव्हरमध्य १९५ धावा केल्या होत्या. अखेरीस टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावत ३०७ धावा केल्या आणि आयर्लंडचा संघ १३३ धावांवर कोसळला. ८८ धावांची शानदार खेळी करणाऱ्या हरनूरला मॅन ऑफ दी मॅच निवडण्यात आले.
हरनूरचे आजोब रजिंदर सिंह यांनी त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. रजिंदर सिंह यांनी रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबसाठी ६ सामने खेळले आहेत. तर हरनूरचे काका भूपिंदर सिंह ज्युनियर यांनी भारतीय संघ अंडर १९ क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. हरनूरचे वडील बरिंदर सिंह यांनीही पंजाबसाठी अंडर १९मध्ये क्रिकेट खेळले ाआहे. सध्या ते ऑल इंडिया रेडिओमध्ये एक प्रेंझेंटर म्हणून काम करत आहेत.
हरनूर टीम इंडियाचा युवा क्रिकेटर शुभमन गिलला आपला आदर्श मानतो. नुकत्याच झालेल्या अंडर १९ आशिया कप स्पर्धेत हरनूरने ५ डावांमध्ये २५१ धावा केल्या होत्या. यात त्याने यूएईविुरुद्ध १२० धावांची खेळी केली होती. त्याने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानविरुद्ध ४६ आणि ६५ धावांची खेळी केली होती.
अंडर १९ वर्ल्डकपच्या सुरूवातीला सराव सामन्यांमध्े हरनूरची बॅट जबरदस्त चालली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात ९ धावाच करता आल्या. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या सरावसामन्यात त्याने १०८ बॉलमध्ये नाबाद शतक ठोकले.