T20 World Cup: पाकिस्तानच्या तिसऱ्या विजयाने भारताचा मार्ग झाला सोपा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 30, 2021 | 15:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

पाकिस्तानच्या सलग तिसऱ्या विजयानंतर भारताचा सेमीफायनलचा मार्ग काही प्रमाणात सोपा झाला आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यास हे एकदम सोपे असणार आहे.

t-20 world cup
T20 World Cup: पाकच्या तिसऱ्या विजयाने भारताचा मार्ग सोपा 
थोडं पण कामाचं
  • जर पाकिस्तानचा संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरली असती तर भारतासाठी सेमीफायनलचा मार्ग मुश्किल झाला असता
  • पाकिसतानने अफगाणिस्तानला पाच विकेटनी हरवले.
  • या विजयासह पाकिस्तानचा सेमीफायनचे(semifinal) स्थान जवळपास निश्चित झाले आहे

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये(t-20 world cup) पाकिस्तानचा संघ(pakistan team) सलग तिसरा सामना जिंकण्यात यशस्वी ठरले. पाकिसतानने अफगाणिस्तानला पाच विकेटनी हरवले. या विजयासह पाकिस्तानचा सेमीफायनचे(semifinal) स्थान जवळपास निश्चित झाले आहे. सोबतच ग्रुपमध्ये पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानावर आहे.तर दुसऱ्या स्थानासाठी भारत(india) आणि न्यूझीलंड(new zealand) प्रबळ दावेदार आहेत. रविवारी या दोन्ही संघात सामना रंगत आहे. जो संघ जिंकेल त्याचे सेमीफायनलमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित असेल. know all the equaion of team india in t-20 world cup

जर पाकिस्तानचा संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरली असती तर भारतासाठी सेमीफायनलचा मार्ग मुश्किल झाला असता आणि हे प्रकरण नेट रनरेटमध्ये फसले असते. दुसऱ्या ग्रुपमध्ये भारतासाठी काय आहेत समीकरण घ्या जाणून...

दुसऱ्या ग्रुपमध्ये भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान हे मोठे संघ आहेत. आपण असे गृहीत धरू की हे तीनही संघ बाकी संघ अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्धचे सामने जिंकली. या आधारावर समीकरणे आहेत. 

  1. जर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळाला आणि पाकिस्तानने सर्व सामने जिंकले तर पाकिस्तानचे १० गुण असतील आणि ते पहिल्या स्थानावर असतील. तर भारत ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असेल. न्यूझीलंडचे ६ गुण असतील. अशातच भारत, पाकिस्तान हे सेमीफायनलला जाणारे संघ असतील. 
  2. जर न्यूझीलंडने भारताला हरवले तर पाकिस्तानच्या स्थितीत काहीच बदल होणार नाही. हा संघ १० गुणांसह पहिल्या स्थानावर तर भारताचे सहा गुण  असतील आणि ते सेमीफायनलला नाही पोहोचणार. न्यूझीलंड सेमीफायनलला जाणारा दुसरा संघ असेल. 

भारताचे सामने

३१ ऑक्टोबर - भारत वि न्यूझीलंड
३ नोव्हेंबर - भारत वि अफगाणिस्तान
५ नोव्हेंबर - भारत वि स्कॉटलंड
८ नोव्हेंबर - भारत वि नामिबिया

उलटसुलट स्थितीत अफगाणिस्तान जिंकू शकतो

अफगाणिस्तान आणि नामिबिया हे दोन्ही संघ अपसेट करण्यात पटाईत आहेत. यापैकी कोणताही संघ न्यूझीलंडला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर भारतासोबतच अफगाणिस्तानचीही उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता वाढेल. अफगाणिस्तान, भारत आणि न्यूझीलंडचे संघ साखळी फेरीतील 3-3 सामने जिंकू शकले, तर नेट रन रेट दुसऱ्या उपांत्य फेरीतील संघाचे नाव निश्चित करेल, सध्या गट 2 मधील या शर्यतीत असलेल्या अफगाणिस्तानचा स्कॉटलंडने 130 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी