मुंबई: आशिया कप २०२२च्या(asia cup 2022) हंगामाला येत्या शनिवारपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडे(srilanka) आहे मात्र यूएईमध्ये स्पर्धा रंगणार आहे. यासाठी भारत(india) आणि पाकिस्तानसह(pakistan) सर्व संघांनी आपली तयारी पूर्ण केली आहे. पाकिस्तानसह काही संघ यूएईमध्ये पोहोचले आहेत. यावेळेस स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने पाहायला मिळू शकतात. Know all the information about asia cup 2022
अधिक वाचा - आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कच्ची हळद, जाणून घ्या कसं
आशिया कपचे क्वालिफायर सामने सुरू झाले आहेत. तर ग्रुप सामने २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. अशातच अनेक चाहते असेही आहेत त्यांना आशिया कपचे वेळापत्रक, कुठे पाहायचे, स्पर्धेत किती संघ असणार त्यांच्यात किती सामने रंगणार यांची उत्तरे माहीत नाहीत. जाणून घेऊया आशिया कप २०२२ बद्दल सर्व काही...
आशिया कपचे यजमानपद यावेळेस श्रीलंकेकडे होते. मात्र देशांतर्गत हिंसाचार तसेच आर्थिक दिवाळखोरीमुळे ही स्पर्धा यूएईमध्ये शिफ्ट करण्यात आली. ही स्पर्धा २७ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे.
आशिया कपचे सामने भारतीय वेळेनुसार रात्री साडेसात वाजता खेळवले जातील. याचे टीव्हीवर लाईव्ह ब्रॉडकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता.
आशिया कपमध्ये ६ संघ भाग घेत आहेत. यांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ ग्रुप आहेत. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान ग्रुप बीमध्ये आहेत. एक संघ क्वालिफायर राऊंडमधून निवडला जाणार आहे. ४ संघ हाँगकाँग, यूएई, कुवैत आणि सिंगापूर यांच्यात क्वालिफायर सामने २१ ऑगस्टपासून सुरू होत आहे. क्वालिफायरमधील विजेता भारत-पाकिस्तान ग्रुपमध्ये राहतील.
६ संघादरम्यान १३ सामने खेळवले जातील. यातील १० सामने दुबई आणि तीन सामने शारजामध्ये खेळवले जातील. यातील ग्रुप स्टेजमध्ये सर्व संघादरम्यान एकूण ६ सामने रंगतील. यानंतर टॉप २ संघ सुपर ४मध्ये रंगतील. येथे सर्व सामने एकमेकांविरोधात ६ सामने खेळणार आहे. त्यानंतर सुपर ४ चे टॉप २ संघ फायनलमध्ये खेळतील. असातच या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात तीन सामने खेळू शकतात.
यावेळेस आशिया कप टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. याचे कारण आहे की या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. हा वर्ल्डकप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल.
आशिया कप पहिल्यांदा १९८४मध्ये आयोजित करण्यात आला होता. भारताने सर्वाधिक ७ वेळा खिताब आपल्या नावावर केला आहे. तर दुसरा यशस्वी संघ श्रीलंका आहे. ते ५ वेळा चॅम्पियन राहिले आहेत. पाकिस्तानने दोन वेळा आशिया कप खिताब जिंकला आहे. भारत एकमेव संघ आहे ज्याने आशिया कपच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये खिताब जिंकला आहे.
अधिक वाचा - आज बुध प्रदोष व्रत; जाणून घ्या मुहूर्त, मंत्र आणि पूजा विधि
२७ ऑगस्ट शनिवार श्रीलंका वि अफगाणिस्तान
२८ ऑगस्ट रविवार भारत वि पाकिस्तान
३० ऑगस्ट मंगळवार बांगलादेश वि अफगाणिस्तान
३१ ऑगस्ट बुधवार भारत वि क्वालिफायर
१ सप्टेंबर गुरूवार श्रीलंका वि बांगलादेश
२ सप्टेंबर शुक्रवार पाकिस्तान वि क्वालिफायर
३ सप्टेंबर शनिवार बी १ वि बी २ सुपर ४
४ सप्टेंबर रविवार ए १ वि ए २ सुपर ४
६ सप्टेंबर मंगळवार ए १ वि बी १ सुपर ४
७ सप्टेंबर बुधवार ए २ वि बी २ सुपर ४
८ सप्टेंबर गुरूवार ए १ वि बी २ सुपर ४
९ सप्टेंबर शुक्रवार बी १ वि ए २ सुपर ४
११ सप्टेंबर रविवार फायनल सामना
सर्व सामने संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरू होतील.