IND vs NZ 1st T20I Playing 11: पहिल्या टी-२०मध्ये भारत-न्यूझीलंडमध्ये हे असू शकतात प्लेईंग ११

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 17, 2021 | 18:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

India (IND) vs New Zealand (NZ) 1st T20I Playing 11 Today Match, Dream11 Team Prediction: आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-२० सामना रंगत आहे. जाणून घ्या काय असू शकतात प्लेईंग ११

india vs new
पहिल्या टी-२०मध्ये भारत-न्यूझीलंडमध्ये असू शकतात प्लेईंग ११ 
थोडं पण कामाचं
  • भारत वि न्यूझीलंड पहिली टी-२०
  • हा सामना जयपूरच्या मैदानावर रंगत आहे.
  • जाणून घ्या दोन्ही संघाचे संभाव्य प्लेईंग ११

India (IND) vs New Zealand (NZ) 1st T20I Playing 11 Today Match, Dream11 Team Prediction: भारत(india) आणि न्यूझीलंड(new zealand) यांच्यात बुधवारपासून टी-२० मालिका(t-20 series) सुरू होत आहे. दोन्ही संघ जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. भारतीय संघाची टी-२० वर्ल्डकपमध्ये कामगिरी खूपच खराब झाली.. मात्र ते सारे विसरून टीम इंडिया पुन्हा नव्याने या सामन्यात उतरत आहे. भारताचा प्रवास टी-२० मध्ये सुपर १२(super 12) राऊंडमध्येच संपला होता. विराट कोहलीच्या कर्णधार म्हणून निवृत्तीनंतर आता रोहित शर्मा याची कमान सांभाळत आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडला टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांच्या हातून ट्रॉफी गेली. कीवी संघ आता पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. भारताविरुद्ध टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडचे नेतृत्व टीम साऊदीकडे असणार आहे. know the india-new zealand Dream11 Team Prediction of playing 11

वेंकटेश अय्यर करू शकतो पदार्पण

टी-२० मालिकेसाठी अनेक अनुभवी खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. यात विराट कोहली, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. त्यांच्या जागी युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. भारत पहिल्या टी-२०मध्ये पॉवर हिटरला उतरवू शकतो. अशातच युवा खेळाडू वेंकटेश अय्यरला पदार्पणाी संधी मिळू शकते. वेंकटेशने आयपीएल २०२१मध्ये केकेआरसाठी चांगली खेळी केली होती. त्याच्यामध्ये लांब आणि मोठे शॉट्स खेळण्याची ताकद आहे. वेंकटेशला ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या रूपात पाहिले जाऊ शकते. पांड्या दुखापतग्रस्त असल्याकारणाने ऑलराऊंडर कामगिरी करू शकला नाही. वेंकटेश अय्यरला श्रेयस अय्यरच्या जागी चौथ्या नंबरला उतरले जाऊ शकते. इशान किशन तिसऱ्या स्थानावर खेळण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादव पाचव्या नंबरवर फलंदाजी करू शकतो. तर गोलंदाजीत भारताला आणखी एका वेगवान गोलंदाजाचा शोध आहे. 

विल्यमसन्स-जॅमीसनशिवाय खेळणार टीम इंडिया

न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन्स आणि ऑलराऊंडर कायनेल जॅमीसन भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळणार नाही. दोघांना कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आराम देण्यााचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजीची मदार मार्टिन गप्टिल आणि डेरिल मिचेल यांच्यावर असणार आहे. लॉकी फर्ग्युसनला संधी मिळण्याची शक्यता आहे. फर्ग्युसन दुखापतग्रस्त असल्याकारणाने टी-२० वर्ल्डकप खेळू शकला नव्हता. 

दोन्ही संघाचे संभाव्य प्लेईंग ११

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ईशान किशन/ऋतुराज गायकवाड़, वेंकटेश अय्यर/श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार/दीपक चाहर, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल/आवेश खान. 

न्यूझीलंड - टीम साऊदी (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चैपमैन, टिम सीफर्ट (विकेटकीपर), जेम्स नीशम, मिचेल सेंटनर, ट्रेंट बोल्ट, एडम मिल्ने/लॉकी फर्ग्युसन, ईश सोढ़ी. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी