धोनीला त्याचे मित्र का म्हणायचे दहशतवादी...घ्या जाणून

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 19, 2019 | 14:38 IST | टाइम्स नाऊ हिंदी

महेंद्र सिंग धोनीचे जवळचे मित्र सत्यप्रकाश यांनी काही रंजक खुलासे केले आहेत. मैदानावर आक्रमक खेळणाऱ्या धोनीला कूल कॅप्टन का म्हणतात अशाच काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

ms dhoni
एम एस धोनी  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई: भारतीय क्रिकेट मधील सर्वात यशस्वी ठरलेला कॅप्टन, यारोंका यार अशी ओळख असलेला महेंद्र सिंग धोनी उर्फ माही. आपल्या मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर त्याने इंडियन क्रिकेट टीममध्ये स्थान मिळवलं. रांचीसारख्या छोट्या शहरातून मेहनत घेत बीसीसीआयमध्ये आपले अस्तित्व निर्माण करणं हे दुर्दम्य इच्छाशक्तीचे उदाहरण आहे. महान क्रिकेटपटू बनण्याआधी जशी त्याची आपल्या रांचीमधील मित्रांशी जशी मैत्री होती तशीच आजही आहे. याच मैत्रीचे किस्से धोनीचे जुने मित्र सत्यप्रकाश यांनी उलगडले आहेत.

एमएस धोनीच्या जीवनावर आधारित 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' आपण पाहिला असेल तर आपल्याला सत्य प्रकाश यांची वेगळी अशी ओळख करून द्यायची गरज लागणार नाही. सत्यप्रकाश यांनीच खडगपूर स्टेशनवर रेल्वेमध्ये माहीला तिकिट कलेक्टरची नोकरी मिळवून दिली होती. हे आपण सिनेमात पाहिलं असेलच. सत्यप्रकाश सध्या खडगपूर प्रिमीयर लीगच्या उद्धाटन एडिशन मध्ये खेळत आहेत.  

सत्य प्रकाश यांना माहीबद्दल विचारले असता त्यांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या, ते म्हणाले, ‘आम्हीतर एमएस धोनीला दहशतवादी म्हणायचो कारण तो २० चेंडूत ४०-५० धावा काढत असे, पण जेव्हापासून त्याने टीम इंडियासाठी खेळायला सुरूवात केली तेव्हापासून तो शांत झाला आहे, मैदानावर खेळत असताना तो थंड डोक्याने डावपेच रचत प्रतिस्पर्धी टीमला हैराण करून सोडतो.’ तसेच आधी धोनी फक्त इंग्रजीत बोलत असे मात्र आता फाडफाड इंग्रजीत बोलतो. तसेच आम्ही मित्र कधीच त्याच्या क्षमता समजू शकलो नाही. 

आगामी वर्ल्डकप हा धोनीच्या करिअरमधील शेवटचा वर्ल्डकप असेल अशा सध्या चर्चा सुरू आहेत. मात्र या सगळ्या चर्चा केवळ अफवा असल्याचे चेन्नई सुपरकिंग्सचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी म्हटले आहे. म्हणाले, ‘पुढच्या वर्षीही धोनी सीएसकेच्या जर्सीमध्ये पुन्हा दिसेल. तसेच आम्हाला विश्वास आहे की धोनी पुढच्या सीजनमध्येही टिममध्ये असेल.’ 

गेल्या दोन वर्षापासून धोनीचापरर्फाेमन्स चांगला राहिला नाही असे बोलले जात आहे मात्र रेकॉर्डस् चेक केले असता असं लक्षात येतं की त्यांची फलंदाजी उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे आगामी वर्ल्डकपमध्येही तो दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
धोनीला त्याचे मित्र का म्हणायचे दहशतवादी...घ्या जाणून Description: महेंद्र सिंग धोनीचे जवळचे मित्र सत्यप्रकाश यांनी काही रंजक खुलासे केले आहेत. मैदानावर आक्रमक खेळणाऱ्या धोनीला कूल कॅप्टन का म्हणतात अशाच काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola