Allahudien Paleker:द. आफ्रिकेच्या अंपायरचे आहे भारताशी नाते, रणजीमध्येही केली आहे अंपायरिंग

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 06, 2022 | 15:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

द. आफ्रिका आणि भारत यांच्यात जोहान्सबर्ग येथे खेळवल्या जात अससलेल्या दुसऱ्या कसोटीत अंपायरिंग करत असलेले अलाउद्दीन पालेकर यांचे महाराष्ट्राशी खास कनेक्शन आहे. 

allahuddin palekar
Allahudien Paleker:द. आफ्रिकेच्या अंपायरचे आहे भारताशी नाते 
थोडं पण कामाचं
  • अंपायर अलाउद्दीन पालेकर यांचे भारताशी आहे कनेक्शन
  • मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिव गावचे आहेत
  • वडिलांनीही केली आहे अंपायरिंग, नोकरीच्या शोधात दक्षिण आफ्रिकेला गेले

मुंबई: द. आफ्रिकेचे अंपायर अल्लाउद्दीन पालेकरने(south africa umpire allahuddien palekar) जोन्हान्सबर्गच्या वॉडरर्समध्ये सुरू असलेल्या भारत आणि द. आफ्रिका(india vs south africa यांच्यातील दुसऱ्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना आपल्या निर्णयांनी प्रभावित केले. मात्र फार कमी लोकांना माहीत असेल की त्यांचे कुटुंब महाराष्ट्राच्या रत्नागिरीचे आहे. know the relation of allahuddin palekar with india

पालेकर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शिव येथील राहणारे आहेत. शिव गावचे सरपंच दुर्वेश पालेकर यांनी बुधवारी पीटीआयला सांगितले की मीही पालेकर आहे. ते आमच्या शिव गावचे राहणारे आहेत.त्यांचे वडील नोकरीसाठी दक्षिण आफ्रिकेला केले आणि तेथेच राहिले. अल्लाहुद्दीन यांचा जन्म द. आफ्रिकेत झाला मात्र त्यांचे मूळ गाव शिव आहे. हे गाव खेड तहसीलअंतर्गत येते. संपूर्ण गावाला आणि ग्रामपंचायतीला त्यांच्यावर गर्व आहे. आमच्या गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. आम्ही खूप खुश आहोत. 

२०१४-१५मध्ये रणजीमध्ये केली होती अंपायरिंग

इतकंच नव्हे तर ४४ वर्षीय पालेकर यांनी २०१४-१५मध्ये डोमेस्टिक सत्रादरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रणजी ट्रॉफीच्या एका सामन्यात अंपायरिंग केली ोती. पालेकरने भारतीय अंपायर कृष्णमचारी श्रीनिवासन यांच्यासह मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यातील लीग टप्प्यातील सामन्यात अंपायरिंग केली होती. 

एक्सचेंज प्रोग्रामअंतर्गत मिळाली होती संधी

मुंबई क्रिकेट संघाचे वरिष्ठ अंपायरनी सांगितले, पालेकर यांनी त्या सामन्यात अंपायरिंग केली होती आणि तसेच अंपायरसच्या आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत भारतात आणखी एक रणजी सामन्यात अंपायरिंग केली होती. पालेकर माजी प्रथम श्रेणी क्रिकेटर आहेत. त्यांचे वडील जमालुद्दीनही अंपायर होते.  

भारताचे आफ्रिकेला 240 धावांचे लक्ष्य

भारताने दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 240 धावांचे लक्ष्य दिले आहे. आफ्रिकन संघाने दुसऱ्या डावात डीन एल्गर 121 चेंडूत 46 धावा केल्यानंतर क्रीजवर आहे. त्याचवेळी रासी वेन ड्युसेनने 37 चेंडूत 11 धावा केल्या आहेत. कीगन पीटरसनने 28 आणि अॅडम मार्करामने 31 धावांचे योगदान दिले. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि रविचंद्रन अश्विनने 1-1 बळी घेतले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी