मुंबई: आशिया कप २०२२च्या(asia cup 2022) वेळापत्रकाची घोषणा(schedulde announcement) झाली आहे. २८ ऑगस्टला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारत-पाकिस्तान(india pakistan) सामना रंगणार. आशिया कप २०२२ची सुरूवात २७ ऑगस्टपासून होणार तर भारत आपल्या अभियानाची सुरूवात २८ ऑगस्टपासून करणार. आशिया कपचा फायनल मुकाबला(asia cup final match) ११ सप्टेंबरला खेळवला जाणार. आशिया कपच्या वेळापत्रकाची घोषणा आशियाई क्रिकेट कौन्सिल म्हणजेच एसीसीचे चेअरमन जय शाह यांनी केली आहे.
अधिक वाचा - 'हे' आहे Shilpa Shetty च्या परफेक्ट फिगरचे रहस्य
आशिया कपमध्ये पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तानात रंगणार आहे. संध्याकाळी ८ वाजता हा सामना सुरू होईल. त्यानंतर रविवारी २८ ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी ८ वाजता सुरू होईल. त्यानंतर ३० ऑगस्टला बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगेल. हा सामना शारजाच्या मैदानावर रंगेल. त्यानंतर बुधवारी ३१ ऑगस्टला भारतआणि क्वालिफायर यांच्यात सामना रंगणार आहे. त्यानंतर गुरूवारी १ सप्टेंबरला श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे. २ सप्टेंबरला पाकिस्तान आणि क्वालिफायर यांच्यात शारजामध्ये सामना रंगणार आहे. ११ सप्टेंबरला रविवारी आशिया कपची फायनल खेळवली जाणार आहे.
The wait is finally over as the battle for Asian supremacy commences on 27th August with the all-important final on 11th September. — Jay Shah (@JayShah) August 2, 2022
The 15th edition of the Asia Cup will serve as ideal preparation ahead of the ICC T20 World Cup. pic.twitter.com/QfTskWX6RD
२७ ऑगस्ट शनिवार श्रीलंका वि अफगाणिस्तान
२८ ऑगस्ट रविवार भारत वि पाकिस्तान
३० ऑगस्ट मंगळवार बांगलादेश वि अफगाणिस्तान
३१ ऑगस्ट बुधवार भारत वि क्वालिफायर
१ सप्टेंबर गुरूवार श्रीलंका वि बांगलादेश
२ सप्टेंबर शुक्रवार पाकिस्तान वि क्वालिफायर
३ सप्टेंबर शनिवार बी १ वि बी २ सुपर ४
४ सप्टेंबर रविवार ए १ वि ए २ सुपर ४
६ सप्टेंबर मंगळवार ए १ वि बी १ सुपर ४
७ सप्टेंबर बुधवार ए २ वि बी २ सुपर ४
८ सप्टेंबर गुरूवार ए १ वि बी २ सुपर ४
९ सप्टेंबर शुक्रवार बी १ वि ए २ सुपर ४
११ सप्टेंबर रविवार फायनल सामना
सर्व सामने संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरू होतील.
बीसीसीयचे सचिव जय शाहने आशिया कपचे वेळापत्रक आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले. त्यांनी लिहिले, अखेर प्रतीक्षा संपली. कारण आशियाई वर्चस्वासाठी २७ ऑगस्टपासून सामने सुरू होत आहेत. ११ सप्टेंबरला फायनल सामना खेळवला जाईल. आशिया कपचा १५वा हंगाम टी-२० वर्ल्डकप आधीच्या महत्त्वाची तयारी करेल.
अधिक वाचा - स्वप्निल जोशीनं शेअर केलं अभिज्ञा भावेचं 'हे' Top Secret
आशिया कप २०२२ आधी श्रीलंकेत आयोजित होणार होता. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून तेथे सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे ही स्पर्धा यूएईमध्ये शिफ्ट करण्यात आली आहे. दरम्यान, आयोजनाच्या तारखांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.