Ind vs SRI T20, Wankhede stadium Gates positions : वानखेडे स्टेडियमचे गेट, स्टँड,  कुठे आणि कुठून जाणार हे जाणून घ्या 

Ind vs SRI T20, Wankhede stadium Gates : वानखेडे स्टेडियमवर आज भारत विरूद्ध श्रीलंका टी 20 सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी तुम्हांला स्टेडियममध्ये जायचे असेल तर कोणत्या गेट जाणार आणि कुठे उतरणार हे जाणून घ्या. 

Know Wankhede Stadium gates, stands, where and from where to go read in marathi
वानखेडे स्टेडियमचे गेट, स्टँड,  कुठे आणि कुठून जाणार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वानखेडे स्टेडियमवर आज भारत विरूद्ध श्रीलंका टी 20 सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी तुम्हांला स्टेडियममध्ये जायचे असेल तर कोणत्या गेट जाणार आणि कुठे उतरणार हे जाणून घ्या.

 Ind vs SRI T20,  Wankhede stadium Gates positions, मुंबई : वानखेडे स्टेडियमवर आज भारत विरूद्ध श्रीलंका टी 20  ( Ind vs SRI T20)सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी तुम्हांला स्टेडियममध्ये जायचे असेल तर कोणत्या गेट जाणार आणि कुठे उतरणार हे जाणून घ्या.  (Know Wankhede Stadium gates, stands, where and from where to go read in marathi)

भारत वि. श्रीलंका ( Ind vs SRI T20) आज रंगणाऱ्या सामन्याची सर्व तिकीट विक्री झाली आहे. त्यामुळे आजचा सामना हाऊसफुल होणार आहे.  वानखेडे स्टेडियम हे चर्चगेट आणि मरिन लाइन्स रेल्वे स्थानकाजवळ आहे. त्यामुळे या दोन स्थानकात आपल्याला उतरावे लागणार आहे. वानखेडे स्टेडियमला एकूण 7 गेट्स आहेत. त्यातील 3 गेट्स हे मरिन लाइन्स स्टेशन जवळ आहेत तर उर्वरित 4 गेट्ससाठी आपल्याला चर्च गेट स्थानकावर जावे लागणार आहे. 

wankhede-stadium-seating-map


गेट नंबर 1 -

 वानखेडे स्टेडियमचा गेट नंबर एक हा चर्चगेट स्थानकाजवळ आहे. तुम्हांला या ठिकाणी जाण्यासाठी चर्चगेट स्टेशनला उतरावे लागणार आहे. या गेटचा वापर ज्यांच्याकडे ग्रँड स्टँडचे तिकीटं आहेत, त्यांनी करावा. 

गेट नंबर 2 -  

वानखेडे स्टेडियमचा गेट नंबर 2 हा चर्चगेट स्थानकाजवळ आहे. तुम्हांला या ठिकाणी जाण्यासाठी चर्चगेट स्टेशनला उतरावे लागणार आहे. या गेटचा वापर ज्यांच्याकडे गरवारे पॅव्हेलियनचे तिकीटं आहेत, त्यांनी  करावा. 

गेट नंबर 3-  

वानखेडे स्टेडियमचा गेट नंबर 3 हा चर्चगेट स्थानकाजवळ आहे. तुम्हांला या ठिकाणी जाण्यासाठी चर्चगेट स्टेशनला उतरावे लागणार आहे. या गेटचा वापर ज्यांच्याकडे विजय मर्चंड स्टँडचे तिकीटं आहेत, त्यांनी  करावा. 

अधिक वाचा : IND vs SL पहिली टी-20 मॅच, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल LIVE

गेट नंबर 4 -

 वानखेडे स्टेडियमचा गेट नंबर 4 हा मरिन लाइन्स स्थानकाजवळ आहे. तुम्हांला या ठिकाणी जाण्यासाठी मरिन लाइन्स स्टेशनला उतरावे लागणार आहे. युनिवर्सिटी ग्राउंडचा वापर करून 4 नंबर गेटला जाता येते. या गेटचा वापर ज्यांच्याकडे सचिन तेंडुलकर स्टँडचे तिकीटं आहेत, त्यांनी  करावा. 

गेट नंबर 5-  

वानखेडे स्टेडियमचा गेट नंबर 5 हा मरिन लाइन्स स्थानकाजवळ आहे. तुम्हांला या ठिकाणी जाण्यासाठी मरिन लाइन्स स्टेशनला उतरावे लागणार आहे. मरिन लाइन्स स्टेशनचा पुढचा ब्रिजचा वापर करून 5 नंबर गेटला जाता येते. या गेटचा वापर ज्यांच्याकडे दिलीप वेंगसकर स्टँडचे तिकीटं आहेत, त्यांनी  करावा.

अधिक वाचा : पॉइंट टेबलचं चित्र कोणाला सुखावतय?

गेट नंबर 6-  

वानखेडे स्टेडियमचा गेट नंबर 6 हा मरिन लाइन्स स्थानकाजवळ आहे. तुम्हांला या ठिकाणी जाण्यासाठी मरिन लाइन्स स्टेशनला उतरावे लागणार आहे. आयकर भवनच्या समोरच्या ब्रिजवरून  6 नंबर गेटला जाता येते. या गेटचा वापर ज्यांच्याकडे विठ्ठल दिवेचा स्टँडचे तिकीटं आहेत, त्यांनी  करावा.

गेट नंबर 7 -  

वानखेडे स्टेडियमचा गेट नंबर 7 हा चर्चगेट स्थानकाजवळ आहे. तुम्हांला या ठिकाणी जाण्यासाठी चर्चगेट स्टेशनला उतरावे लागणार आहे. या गेटचा वापर ज्यांच्याकडे एमसीए स्टँडचे तिकीटं आहेत, त्यांनी  करावा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी