T-20 world cupमध्ये रिझवान आणि कोहली यांच्यात घडली होती ही मजेदार गोष्ट, पाकिस्तानी विकेटकीपरने खोलले गुपित

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 19, 2022 | 13:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mohammad Rizwan on Virat Kohli: मोहम्मद रिझवानने टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यातील एक गुपित उघड केले आहे. 

Kohli-rizwan
world cupमध्ये रिझवान आणि कोहली यांच्यात झाले होते हे बोलणे 
थोडं पण कामाचं
  • भारत आणि पाकिस्तानचे संघ वर्ल्डकप २०२१मध्ये आमनेसामने आले होते.
  • पाकिस्तानी संघाने हा सामना १० विकेटनी जिंकला होता. 
  • कोहली-पंतनेही भारतासाठी धावा केल्या होत्या. 

मुंबई: पाकिस्तान संघाने(pakistani team) टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये(t-20 world cup 2021) भारताविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला होता. भारताला(india) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १० विकेटनी पराभव सहन करावा लागला होता. आयसीसी वर्ल्डकप(वनडे, टी-२०)मध्ये पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा हा पहिला पराभव होता. भारताने या सामन्यात ७  विकेटवर १५१ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने प्रत्युत्तरात हे आव्हान १७.५ ओव्हरमध्ये एकही गडी न गमावता पूर्ण केले होते. विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवान(mohammad rizwan)(नाबाद ७९) आणि कर्णधार बाबर आझम(babar azam)(नाबाद ६८) यांच्या जोरावर हा सामना जिंकला. या सामन्याच्या तीन महिन्यांनी रिझवानने आता मजेदार गुपित उघड केले आहे. know what was conversation between Kohli and Rizwan during t-20 world cup match

रिझवान-कोहली यांच्यात मजेदार बातचीत

सामन्याता भारताची आघाडीची फळी कोसळली होती. अशातच विराटट कोहली(५९) आणि ऋषभ पंत(३९) यांनी भारताचा डाव सावरला. दोघांमध्ये ५३ धावांची भागीदारी झाली. या पार्टनरशिपदरम्यान पंतने रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा विकेटकीपर रिझवानह पाकिस्तानी संघाने एलबीडब्लूचे अपील केले आणि पुन्हा रिव्ह्यू घेण्यात आला.

यानंतर रिझवान आणि कोहली यांच्यात गमतीची चर्चा झाली होती याचा पाकिस्तानचा विकेटकीपर रिझवानने खुलासा केला आहे. रिझवानने Paktv.tvला दिलेल्या मुलाखतीत विराट शानदार व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. 

१० ओव्हरमध्येच सगळ्यांना बाद करायचे आहे?

रिझवानने सांगितसे, सामन्यात काही गोष्टी हा रणनितीचा भाग असात. यात कोणतीच शंका नाही की विराट कोहली जगातील नंबर वन क्रिकेटर आहे. जेव्हा आम्ही क्रिकेट खेळत असतो तेव्हा एका कुटुंबाप्रमाणे असतो. मला आठवते की जेव्हा पंतने रिव्हर्स स्वीप खेळला होता तेव्हा त्याच्याविरुद्ध आम्ही रिव्ह्यू घेतला. त्यादरम्यान कोहलीने म्हटले की तुम्ही काय करत आहात? १० ओव्हरमध्येच सगळ्यांना बाद करायचे आहे का?

रिझवानने पुढे सांगितले, जसे मी सांगितले की रणनीतीचा एक भाग असतो. मी जेव्हा त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलो तेव्हा मी त्यांच्याशी बातचीत केली होती. बाकी गोष्टी चेंजिंग रूमच्या आत झाल्या. ज्या सामन्यात नाही सांगता येत. मात्र मी सांगू शकतो की कोहली खूपच मस्त व्यक्ती आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी