IND vs ZIM: जाणून घ्या भारत-झिम्बाब्वे पहिली वनडे कुठे आणि कधी पाहाल?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 17, 2022 | 17:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs Zimbabwe, IND vs ZIM 1st ODI Live Cricket Score Streaming Online on Sony LIV: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील वनडे मालिकेला सुरूवात होत आहे. जाणून घ्या वनडे मालिकेतील पहिला सामना कुठे आणि कधी पाहाल...

india vs zimbawbe
जाणून घ्या भारत-झिम्बाब्वे पहिली वनडे कुठे आणि कधी पाहाल? 
थोडं पण कामाचं
  • भारताचा झिम्बाब्वे दौरा २०२२ वनडे मालिका
  • पहिल्या वनडेचे सामन्याचे आयोजन हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये होईल. 
  • टीम इंडिया ६ वर्षानंतर करतेय झिम्बाब्वे दौरा

मुंबई: अखेर सहा वर्षांनी भारतीय क्रिकेट संघ(indian cricket team) झिम्बाब्वे दौऱ्यावर(zimbawbe tour) पोहोचून मालिका(series) खेळण्यासाठी सज्ज आहे. अखेरच्या वेळेस टीम इंडियाने २०१६मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला होता. भारत आणि झिम्बाब्वे(india vs zimbawbe) यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना कुठे आणि कधी खेळवला जाणार आहे. जाणून घ्या...know where and when to watch india vs zimbawbe one day match

अधिक वाचा - मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात टीम इंडियाचे नेतृत्व केएल राहुलच्या हाती आहे. तर शिखर धवन उपकर्णधार असेल. तर झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व क्रेग इर्विनच्या अनुपस्थितीत रेजिस चकाब्वाच्या हाती असेल. 

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला वनडे सामना कुठे खेळवला जाईल?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला वनडे सामना १८ ऑगस्टला गुरूवारी खेळवला जाईल. 

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिली वनडे कुठे खेळवली जाणार?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला वनडे सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल.

यजमान झिम्बाब्वे आणि टीम इंडिया यांच्यातील पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होईल?

भारत-झिम्बाब्वे यांच्यातील पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १२.४५ वाजता सुरू होईल. टॉस सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी होईल. 

झिम्बाब्वे आणि टीम इंडिया यांच्यातील वनडे सामन्याचे लाईव्ह प्रसारण कोणत्या चॅनेलवर प्रसारित होईल?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचे लाईव्ह प्रसारण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. 

अधिक वाचा -  गणेश चतुर्थीच्या दिवशी जुळन येईल हा शुभ योग

भारत-झिम्बाब्वे पहिला वनडे सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता. 

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही सोनी लिव्ह अॅपवर पाहू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी