सचिन तेंडुलकरने निवडले इतिहासातील बेस्ट ११, कोहली-धोनीला काढले बाहेर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 03, 2022 | 12:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

sachin tendulkar: सचिन तेंडुलकरने स्वत: आपल्या बेस्ट ११ खेळाडूंची एक टीम बनवली आहे त्यात अनेक दमदार खेलाडूंना जागा दिली आहे. दरम्यान या टीम निवडीबाबत अनेक आश्चर्यजनक निर्णय घेतले आहेत. 

sachin tendulkar
सचिन तेंडुलकरने निवडले इतिहासातील बेस्ट ११, कोहली-धोनी बाहेर 
थोडं पण कामाचं
  • सचिनने निवडली बेस्ट प्लेईंग ११
  • स्टार खेळाडूंना दिली जागा
  • कोहली-धोनीला केले बाहेर

मुंबई: क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या(sachin tendulkar) नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. एकेकाळी सचिनला जगातील मोठ्यातला मोठा बॉलर घाबरत असे आणि तो आपल्या काळातील बेस्ट फलंदाज(best batsman) होता. मात्र जेव्हा सचिनने गेल्या वर्षी आपली बेस्ट ११ खेळाडूंची(best playing 11 team) टीम बनवली तेव्हा त्यात अनेक आणि दमदार खेळाडूंना त्यात स्थान दिले. दरम्यान, या टीम निवडीदरम्यान अनेक आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले. Kohli, dhoni not incude in sachin tendulkat best playing 11 team

तेंडुलकरने निवडली जगातील बेस्ट Playing XI

सचिन तेंडुलकरने ज्या भारतीय खेळाडूंना आपल्या प्लेईंग ११मध्ये निवडले आहेत त्यात वीरेंद्र सेहवाग, सुनील गावस्कर, सौरव गांगुली, हरभजन सिंग यांच्या नावाचा समावेश आहे. सचिनने आपल्या बेस्ट ११मध्ये भारताचा वीरेंद्र सेहवाग आणि सुनील गावस्कर यांना स्थान दिले आहे. तिसऱ्या स्थानावर  वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराला स्थान दिली आहे. सचिनने वेस्ट इंडिजच्या विवियन रिचर्ड्स यांना संघात चौथे स्थान दिले आहे. 

मिडल ऑर्डरमध्ये यांना स्थान

सचिनने पाचव्या स्थानावर द. आफ्रिकेचा ऑलराऊंडर जॅक कॅलिसला जागा दिली आहे. तर माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला सहाव्या स्थानावर ठेवले आहे. त्याने विकेटकीपरसाठी धोनीला निव़डले नाही तर ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टला सातव्या स्थानावर जागा दिली आहे. हैराणजनक बाब म्हणजे फलंदाज विराट कोहलीला या संघात स्थान दिलेले नाही. 

अक्रमची बेस्ट वेगवान गोलंदाज म्हणून निवड

ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्नला सचिनने आपल्या यादीत ८व्या स्थानावर लिहिले आहे. पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमला प्लेईंग ११मध्ये ९व्या स्थानावर ठेवले आहे. भारताच स्पिनर हरभजन सिंग १०व्या आणि तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा सचिन्ा प्लेईंग ११मध्ये ११व्या स्थानावर आहे. 

कोहली-धोनी बाहेर

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीची निवड न करणे हे हैराणजनक आहे. धोनी सचिनच्या खूप जवळ होता त्याच्याच नेतृत्वाखाली सचिनला वर्ल्डकप जिंकता आला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी