Virat Kohli: विराट कोहलीच्या लॅपटॉपमध्ये लपलेय काही खास, पासवर्ड टाकताच समोर आला हा फोटो

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 20, 2022 | 17:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Virat Kohli Laptop Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विराट कोहलीच्या लॅपटॉपमध्ये लपलेले काही खास फोटो पाहायला मिळत आहे. 

virat kohli
कोहलीच्या लॅपटॉपमध्ये लपलेय खास, पासवर्ड टाकताच समोर आले हे. 
थोडं पण कामाचं
  • विराट कोहलीला २०११मध्ये पहिल्यांदा सफेद जर्सीमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती.
  • या कसोटीच्या पहिल्या डावात कोहलीने ४ तर दुसऱ्या डावात १५ धावा केल्या होत्या.
  • कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये ११ वर्षे पूर्ण होण्यानिमित्त खास व्हिडिओ शेअर केला आहे.

मुंबई: विराट कोहलसाठी(virat  २० जून हा दिवस खास आहे. कोहलीने याच दिवशी आपल्या कसोटी करिअरला सुरूवात केली होती. विराट कोहलीने २०११ या साली वेस्ट इंडिजविरुद्ध सबीना पार्कमध्ये आपले कसोटी पदार्पण केले होते. कोहलीने या खास निमित्ताने सोशल मीडिया अकाऊंट्सवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने लॅपटॉप ऑन करून खास फोटो शेअर केला आहे. kohli laptop video share on social media

अधिक वाचा - देशातील आघाडीच्या बँकांमधील एफडीवरील ताजे व्याजदर

विराटच्या लॅपटॉपमध्ये दिसला हा फोटो

विराट कोहलीला २०११मध्ये पहिल्यांदा सफेद जर्सीमध्ये खेळण्याची संधी मिळाली होत. या कसोटीच्या पहिल्या डावात कोहलीने ४ तर दुसऱ्या डावात १५ धावा केल्या होत्या. कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये ११ वर्षे पूर्ण होण्यानिमित्त खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो लॅपटॉप ऑन करताना दिसत आहे आणि त्याने त्याने एका फोल्डरमध्ये कसोटी क्रिकेटमधील आपले फोटो ठेवले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. 

कोहलीचे कसोटी करिअर

विराट कोहली भारतासाठी १०० कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील आहे. त्याने आतापर्यंत १०१ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कोहलने १०१ कसोटी सामन्यांमध्ये ७ दुहेरी शतके. २७ शतके आणि २८ अर्धशतके ठोकली आहेत. याद्वारे त्याने ८०४३ धावा केल्यात. विराट कोहली कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामना जिंकून देणारा कर्णधार आहे. 

येथे पाहा कोहलीची पोस्ट

अधिक वाचा - कॅबर कार रोपवेच्या मध्यभागी अडकली, पाहा व्हिडीओ

या दोन खेळाडूंनी केले होतो पदार्पण

भारतीय क्रिकेटसाठी २० जून ही तारीख खूप खास आहे. या दिवशी सौरव गांगुली आणि द वॉल अशी ओळख असलेल्या राहुल द्रविडनेही कसोटीत पदार्पण केले होते. १९९६मध्ये इंग्लंडविरुद्ध या दोन खेळाडूंनी आपला कसोटी सामना खेळला होता. आजच्या काळात सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष आहे तर राहुल द्रविड टीम इंडियाचा हेड कोच आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी