कोहली, रोहित आणि बुमराहला मिळणार एकसारखे मानधन, बीसीसीआयने जारी केली वार्षिक कंत्राटांची यादी

बीसीसीआयच्या पद्धतीनुसार ए+, ए, बी आणि सी या श्रेण्यांमध्ये खेळाडूंची विभागणी केली जाते आणि त्यानुसार या खेळाडूंचे मानधन ठरवले जाते. जाणून घ्या कोणत्या क्रिकेटपटूला बीसीसीआयने कोणत्या श्रेणीत ठेवले आहे.

Indian cricket team
कोहली, विराट आणि बुमराहला मिळणार एकसारखे मानधन, बीसीसीआयने जारी केली वार्षिक कंत्राटांची यादी 

थोडं पण कामाचं

  • ए श्रेणीत बीसीसीआयने दिली 10 खेळाडूंना जागा
  • शुभमन गिल आणि मोहम्मद सिराजला मिळाली सी श्रेणी
  • बीसीसीआयची वार्षिक अनुबंध सूची जाणून घ्या

मुंबई :  भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डाने (Board of Control for Cricket in India) भारतीय क्रिकेट संघातील (Indian cricket team) खेळाडूंना (players) वार्षिक केंद्रीय अनुबंध (annual central contract) जारी केला आहे. बीसीसीआयच्या (BCCI) या अनुबंधानुसार या खेळाडूंना त्यांचे मानधन (salary) दिले जाते. बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार (captain) विराट कोहली (Virat Kohli), सलामीचा फलंदाज (opening batsman) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जलदगती गोलंदाज (fast bowler) जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) यांना ए + या श्रेणीत ठेवले आहे. याचा अर्थ त्यांना वर्षाला 7 कोटी रुपये मिळतील.

ए श्रेणीत बीसीसीआयने दिली 10 खेळाडूंना जागा

या तीन खेळाडूंना बीसीसीआयने ए + श्रेणीत ठेवले आहे तर इतर 10 खेळाडूंना ए श्रेणीत स्थान दिले आहे. या खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, के. एल. राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. यांना वार्षिक 5 कोटी रुपयांचे मानधन दिले जाणार आहे.

शुभमन गिल आणि मोहम्मद सिराजला मिळाली सी श्रेणी

बीसीसीआयच्या नव्या कंत्राटांमध्ये सलामीचा फलंदाज शुभमन गिल आणि जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज यांना पहिल्यांदाच केंद्रीय अनुबंध मिळाला आहे आणि त्यांना सी श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या दोघांना वर्षाला 1 कोटी रुपये मिळतील. तर जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही बी श्रेणीत ठेवण्यात आले आहे. त्याला वर्षाला 3 कोटी रुपये मिळतील. याआधी तो ए श्रेणीत होता.

बीसीसीआयची वार्षिक अनुबंध सूची जाणून घ्या

ग्रेड ए प्लस (सात कोटी रुपये): विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह. 

ग्रेड ए (पाच कोटी रुपये): आर. अश्विन, रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, के. एल. राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या. 

ग्रेड बी (तीन कोटी रुपये): रिद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर आणि मयंक अग्रवाल. 

ग्रेड सी (एक कोटी रुपये): कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चाहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी