टी20 वर्ल्ड कपमध्ये नाही मिळाली कोहलीच्या 'या' खास खेळाडूला जागा; निवड समितीच्या निर्णयामुळे आलं वादळ

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या टी -20 विश्वचषकासाठी (T20 World Cup)15 सदस्यांचा भारतीय संघ असणार आहे.

Kohli's 'this' special player did not get a place in the T20 World
टी20 वर्ल्ड कपमध्ये नाही मिळाली कोहलीच्या 'या' खास खेळाडूला जागा  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • युझवेंद्र चहलला टी -20 विश्वचषक संघातून वगळण्यात आलं.
  • 17 ऑक्टोबरपासून टी 20 विश्वचषक 2021 ला सुरुवात
  • युएईच्या खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना गोलंदाजीसाठी उत्तम आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या टी -20 विश्वचषकासाठी (T20 World Cup)15 सदस्यांचा भारतीय संघ असणार आहे. परंतु निवडकर्त्यांची एका निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. निवड समितीच्या या निर्णयामुळे वादळ निर्माण झाले आहे. वास्तविक, भारताचा सर्वोत्तम टी20 गोलंदाज मानला जाणारा लेगस्पिनर युझवेंद्र चहलला टी -20 विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे.

हा खेळाडू झाला उदास

युझवेंद्र चहल हा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या सर्वात जवळच्या खेळाडूंपैकी एक मानला जातो. दोघेही RCB मध्ये एकत्र खेळतात, त्यामुळे त्यांच्यात चांगले बंधन आहे. युझवेंद्र चहलची काही काळ कामगिरी कमी झाल्याने निवडकर्त्यांनी त्याला टी-20 विश्वचषक संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

विश्वचषकातून झाली सुटका

टी 20 विश्वचषक 2021 डोक्यावर आहे आणि सर्व संघांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे. 17 ऑक्टोबरपासून टी 20 विश्वचषक 2021 ला सुरुवात होत आहे. टीम इंडियाची फिरकी गोलंदाजी गेल्या काही काळापासून खूपच कमकुवत झाली आहे. लेगस्पिनर युझवेंद्र चहलची कामगिरीही खराब झाली आहे.   

टी 20 विश्वचषकासाठी 5 मजबूत फिरकीपटू

टी 20 विश्वचषक 2021 मध्ये युझवेंद्र चहल इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजच्या पॉवर हिटर्ससमोर टीम इंडियाची सर्वात मोठी कमजोरी ठरू शकतो.  या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या टी -20 मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांनी युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीला झोडपलं होतं. यामुळे टी -20 विश्वचषकासाठी 5 मजबूत फिरकीपटूंची निवड करण्यात आली आहे. 

रविचंद्रन अश्विनलाही संधी मिळाली

युएईच्या खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना गोलंदाजीसाठी मदत मिळत आहे. यामुळे पाच उत्तम फिरकीपटूंची संघात निवड करण्यात आली आहे. या पाचमध्ये ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनची टी -20 विश्वचषकासाठी निवड झाली आहे. राहुल चहर, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनाही आयपीएलमधील चांगल्या कामगिरीबद्दल बक्षिस मिळालं आहे.

टी 20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघ 

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (व्हीसी), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी. 
शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांचा 15 जणांच्या भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, अय्यरला स्टँडबाय प्लेअरमध्ये ठेवण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी