रोमहर्षक सामन्यानंतर कोलकात्याचा 2 धावांनी पराभव, लखनौकडून IPL प्लेऑफमध्ये प्रवेश

KKR VS LSG : लखनौ सुपर जायंट्सने शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा फक्त दोन धावांनी पराभव करून IPL प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

Kolkata thrashed by 2 runs after thrilling match, entered the IPL playoffs from Lucknow
रोमहर्षक सामन्यानंतर कोलकात्याचा 2 धावांनी पराभव, लखनौकडून IPL प्लेऑफमध्ये प्रवेश 
थोडं पण कामाचं
  • लखनौ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर
  • 14 सामन्यांमधला हा नववा विजय होता
  • डी कॉकने आयपीएलमधील आपले दुसरे शतक झळकावले.

मुंबई : DY पाटील स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने 19 षटकांत एकही विकेट न गमावता 210 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकांत 7 गडी गमावून 208 धावाच करता आल्या. संघाला 2 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. (Kolkata thrashed by 2 runs after thrilling match, entered the IPL playoffs from Lucknow)

अधिक वाचा : 

बटलरची बॅट शांत, तरीही ऑरेंज कॅपच्या यादीत अव्वल

लखनौचा 14 सामन्यांमधला हा नववा विजय होता आणि 18 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर कोलकाताला 14 सामन्यांमधला आठवा पराभव पत्करावा लागला आणि त्याचे 12 गुण राहिले. कोलकाताकडून कर्णधार श्रेयस अय्यरने 50 धावा केल्या. राणा 42, बिलिंग्ज 36, नरेन 21 आणि रिंकू सिंगने 40 धावांची दमदार खेळी केली.

अधिक वाचा : 

India vs SA T20 Series: BCCI चा मास्टर प्लॅन! आता राहुल द्रविडसोबत VVS लक्ष्मणही असणार भारतीय संघाचे कोच 

याआधी डी कॉकने आयपीएलमधील आपले दुसरे शतक झळकावले. या सामन्यात डी कॉक 70 चेंडूत 140 धावा करत नाबाद राहिला. कर्णधार केएल राहुलने 51 चेंडूत 61 धावा केल्या. डी कॉकने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 10 षटकार मारले, तर कर्णधार केएल राहुलने 4 षटकार आणि 3 षटकार ठोकले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी