Lanka Premier League 2022: श्रीलंकेची आर्थिक स्थिती खराब; तरीदेखील रंगणार लंका प्रीमियर लीगचा थरार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 11, 2022 | 15:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lanka Premier League 2022 । सध्या श्रीलंकेची आर्थिक स्थिती खूपच खराब आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला श्रीलंका क्रिकेटला पूर्णपणे समर्पित असल्याचे पाहायला मिळत आहे.

Lanka Premier League 2022 held between 31st July to 21st August
श्रीलंकेची आर्थिक स्थिती खराब तरीदेखील रंगणार LPL चा थरार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या श्रीलंकेची आर्थिक स्थिती खूपच खराब आहे.
  • लवकरच रंगणार लंका प्रीमियर लीगचा थरार.
  • या स्पर्धेचा तिसरा हंगाम ३१ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत खेळवला जाईल.

Lanka Premier League 2022 । नवी दिल्ली : सध्या श्रीलंकेची आर्थिक स्थिती खूपच खराब आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला श्रीलंका क्रिकेटला पूर्णपणे समर्पित असल्याचे पाहायला मिळत आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) लंका प्रीमियर लीगचा (LPL) तिसरा हंगाम १ जुलै पासून सुरू करण्याची संपूर्ण तयारी केली आहे. (Lanka Premier League 2022 held between 31st July to 21st August). 

दरम्यान, श्रीलंकेच्या बोर्डाने म्हटले की प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम ३१ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण ५ संघ सहभागी होतील. स्पर्धेच्या सुरूवातीचे सामने कोलंबो येथे खेळवले जातील. यानंतरचे बहुतांश सामने हंबनटोटा स्टेडियमवर शिफ्ट केल जातील. 

अधिक वाचा : ड्रग्ज प्रकरणावर आर्यन खानची प्रतिक्रिया

लवकरच विदेशी खेळाडूंची होणार निवड

ही संपूर्ण माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले की यंदाच्या हंगामात ५ संघाचे एकूण २४ सामने खेळवले जातील. शम्मी सिल्वा यांनी सांगितले की, हे सांगताना खूप आनंद होत आहे की लंका प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. यावेळी देखील या लीगचे अधिकृत अधिकार आयपीजी समूहाकडेच राहतील. २०२० ते २०२४ या कालावधीत या समूहासोबत करार करण्यात आला आहे. तसेच या लीगसाठी लवकरच विदेशी खेळाडूंची निवड केली जाईल. 

आतापर्यंत दोन्ही हंगाम जाफना संघाच्या नावावर 

लंका प्रीमियर लीगचे आतापर्यंत दोन हंगाम झाले आहेत. पहिला हंगाम २०१८ करण्याचे निश्चित झाले होते, नंतर प्रशासकीय अडचणी आणि नंतर कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. याच्या पश्चात पहिला हंगाम २०२० मध्ये पार पाडला. तेव्हा जाफना किंग्सने किताब पटकावला होता. यानंतर जाफना संघाने सलग दुसऱ्यांदा किताबावर आपले नाव कोरले. 

यंदा लंका प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम असणार आहे. अशा परिस्थितीत या स्पर्धेत जाफना व्यतिरिक्त गॅले ग्लॅडिएटर्स, कॅंडी वॉरियर्स, कोलंबो स्टार्स आणि डंबुला जायंटस हे संघ देखील किताबासाठी मैदानात असणार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे मागील दोन्हीही हंगामाच्या अंतिम सामन्यात जाफना संघाने गॅले संघाला चितपट करून विजय मिळवला होता. म्हणजेच गॅले संघ दोन्ही हंगामात उपविजेता राहिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी