धोनीची रिटायरमेंट, लतादीदींनी केली ही विनंती

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 11, 2019 | 15:55 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर धोनीच्या रिटायरमेंटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. धोनी रिटायर होण्याच्या चर्चां प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्यापर्य्त पोहोचल्या आणि त्यांनी माहीला एक संद

lata mangeshkar and ms dhoni
लता मंगेशकर आणि एम एस धोनी 

थोडं पण कामाचं

  • लता मंगेशकर यांनी केले ट्वीट
  • धोनीला निवृत्त न होण्याची विनंती
  • धोनीने निवृत्त होऊ नये असे लतादीदींचे मत

मुंबई: भारतीय संघ सेमीफायनलमधील पराभवामुळे वर्ल्डकपबाहेर गेला आहे. सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. वर्ल्डकपदरम्यान अशा चर्चा होत्या की धोनीचा हा शेवटचा वर्ल्डकप आहे आणि ते यानंतर रिटायरमेंटची घोषणा करू शकतो. मात्र आता भारताचा वर्ल्डकपमधील प्रवास संपला आहे. त्यामुळे धोनी रिटायरमेंट घेईल का अशी चर्चा रंगली आहे. 

दरम्यान, प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना धोनीच्या रिटायरमेंटची गोष्ट आवडलेली दिसत नाहीये. त्यामुळेच त्यांनी धोनीला इतक्यात रिटायर होऊ नकोस असा सल्ला दिला. त्याच्यासोबत रवींद्र जडेजानेही त्याला सामन्यात चांगली साथ दिली होती. लता मंगेशकर या धोनीच्या निवृत्त होण्याच्या विचाराशी सहमत नाही. लतादीदी यांच्या मते धोनीने सध्या निवृत्ती घेण्याचा विचार करू नये. 

त्यांच्या म्हणण्यानुसार टीम इंडियाला धोनीची खूप गरज आहे. तसेच त्यांनी यावेळी माहीला निवृत्त  न होण्याचा सल्ला दिला आहे. निवृत्तीचे विचारही डोक्यात आणू नये असे त्यांनी म्हटले आहे. 

आपल्या ट्वीटमध्ये लता मंगेशकर यांनी लिहिले, 'नमस्कार एम. एस. धोनी जी। आज कल मैं सुन रही हूं कि आप रिटायर होना चाहते हैं। कृपया आप ऐसा मत सोचिए। देश को आपके खेल की जरूरत है और ये मेरी भी विनती है कि आप रिटायरमेंट का विचार भी मन में मत लाइए।'

 

 

विशेष म्हणजे या वर्ल्डकपमध्ये महेंद्रसिंग धोनीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सेमीफायनलमध्ये त्याने ५० धावांची खेळी केली होती. या दरम्यान, टीम इंडियाचे इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात साफ अपयशी ठरले. धोनीने रविंद्र जडेजासोबत १००हून अधिक धावांची भागीदारी केली. दरम्यान, भारताला हा सामना काही जिंकता आला नाही मात्र धोनीने अपली जबाबदारी चांगली निभावली. जोपर्यंत धोनी क्रीझवर होता तोपर्यंत सामना जिंकू शकतो असा विश्वास भारताच्या चाहत्यांना होता मात्र धोनी बाद झाला आणि क्रिकेट चाहत्यांच्या आशाही मावळल्या. 

४९व्या ओव्हरमध्ये दोन धावा घेण्याच्या नादात धोनी रनआऊट झाला. याआधी २०१५मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्डकप सेमीफायनल सामन्यात धोनीने महत्त्वपूर्ण खेळी केली होती. मात्र यावेळी इतर फलंदाज सपशेल अयश्वी झाल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी