लिअँडर पेस अडकणार तिसऱ्यांंदा लग्नबंधन !, त्याच्या गर्लफ्रेंडचे होते या क्रिकेटरसोबत अफेअर

किम शर्मा आणि लिएंडर पेस दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. या नवीन नात्यासाठी किम शर्मा आणि लिएंडर पेस यांना त्यांच्या कुटुंबीयांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच दोघेही लग्न करून वधू-वर बनण्याच्या तयारीत आहेत.

Leander Paes to tie the knot for third party! He had an affair with his girlfriend
लिअँडर पेस अडकणार तिसऱ्यांंदा लग्नबंधन !, त्याची गर्लफ्रेंड होते या क्रिकेटरसोबत अफेअर ।   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • टेनिस स्टार लिएंडर पेस आणि बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.
  • बऱ्याच दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा
  • आता त्या दोघांच्या नात्याबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे.

मुंबई : भारताचा माजी टेनिसपटू लिएंडर एड्रियन पेस लवकरच बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मासोबत लग्न करणार आहे. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि आता ते या नात्याला लग्नाचे नाव देण्याची तयारी करत आहेत. किम शर्माचे हे पहिले लग्न नसले तरी यापूर्वी तिने 2010 मध्ये बिझनेसमन अली पुंजानीसोबत लग्न केले होते. इतकंच नाही तर दिग्गज क्रिकेटर युवराज सिंगसोबतही तिच्या अफेअरची चर्चा आहे. (Leander Paes to tie the knot for third party! He had an affair with his girlfriend)

अधिक वाचा : 'KGF Chapter 2' च्या स्टार ॲक्टरची एक्झिट, चित्रपटसृष्टीत हळहळ

किम शर्माने बॉलिवूड चित्रपट मोहब्बतेंमधून खूप नाव कमावलं. ती नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. किम आणि लिएंडर लवकरच कोर्ट मॅरेज करून कौटुंबिक आयुष्याला सुरुवात करणार आहेत. ती नेहमीच तिच्या नात्याबद्दल चर्चेत असते आणि अनेकदा तिच्या पार्टनरसोबतचे फोटो शेअर करत असते.

अधिक वाचा :

Mothers Day 2022 Marathi Quotes: मदर्स डे निमित्ताने Images, Wallpaper, Messages, द्वारे शेअर करा आई विषयी प्रेम व्यक्त करणारे मराठी सुविचार

किम शर्मा अनेक दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर आहे. ती शेवटची 2011 मध्ये 'लूट' चित्रपटात दिसली होती. मात्र, सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे फोटो आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. यापूर्वी किम शर्माचे लग्न अली पुंजानी नावाच्या प्रसिद्ध उद्योगपतीसोबत झाले होते. पण दोघांचे लग्न 6 वर्षेही टिकले नाही आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. इतकेच नाही तर भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगसोबतही किम शर्माचे नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. दोघेही एकमेकांशी लग्न करणार असल्याचेही बोलले जात होते, मात्र युवराजच्या आईला हे नाते मान्य नव्हते, त्यामुळे दोघे वेगळे झाले.  किम शर्मा तिचे आयुष्य पुन्हा सेटल करणार आहे, तीही खेळाडूसोबत. त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. पण लवकरच हे कपल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

अधिक वाचा :

Yuzvendra Chahal's Wife Dhanashree Verma Photoshoot : यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्रीची गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात कातिल अदा, फोटोने सर्वाना घातली भुरळ

लिएंडर पेसचे पहिले लग्न अभिनेत्री महिमा चौधरीशी झाले होते. हे लग्न 2000 ते 2003 पर्यंत टिकले. यानंतर तो संजय दत्तची माजी पत्नी रिया पिल्लईसोबत लिव्ह इन राहिला, काही काळानंतर दोघांनी लग्न केले, त्यानंतर त्यांना एक मुलगीही झाली, पण 2014 मध्ये त्यांनी रियापासून घटस्फोट घेतला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी