Pele Passed Away :महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन

जगातील महान फुटबॉलर ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू पेले (Pele) यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेले यांची प्रकृती नाजूक होती.

Legendary footballer Pele died
महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन  |  फोटो सौजन्य: BCCL

Pele Demise : जगातील महान फुटबॉलर ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू पेले (Pele) यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेले यांची प्रकृती नाजूक होती. काही महिन्यांपासून  ते कर्करोगाशी लढा देत होते, पण गेले काही दिवस त्यांची अवस्था बिकट झाली होती. ज्यानंतर अखेरचा श्वास घेतला. (Legendary footballer Pele died at the age of 82)

अधिक वाचा  : नववर्षाची Welcome Party करायची आहे? मग 'या' ठिकाणी जा

पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो (Kely Nascimento) हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ''आम्ही जे काही आहोत त्यासाठी तुमचे आभारी आहोत. आम्ही तुझ्यावर असीम प्रेम करतो, Rest in Peice असं कॅप्शन लिहित केलीने सर्व कुटुंबियांचा हात पेले याच्या हाताजवळ असल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. 

अधिक वाचा  : मुख्यमंत्री शिंदेकडून नव्या वर्षात शेतकऱ्यांना नवे गिफ्ट

काही दिवसांपासून पेले यांचे कुटुंबिय  साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात जमा झाले होते. या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  

कॅन्सर आजारामुळे त्यांची किडनी आणि हृदय काम करत नव्हतं. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावली होती. सप्टेंबर 2021 मध्ये पेले यांच्या कोलनमधून एक ट्यूमर काढण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आता कॅन्सर उपचारासाठी पेले रुग्णालयात होते. पण मागील काही दिवसांपासून पेले केमोथेरपीला प्रतिसाद देत नव्हते. ज्यानंतर अखेर त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी