Legends League Cricket: इमरान ताहिरने फलंदाजीतून केली कमाल; आक्रमक खेळी करत इंडिया महाराजाला केले चितपट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 23, 2022 | 16:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Legends League Cricket | लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये इंडिया महाराजा संघाला पहिल्यादांच पराभवाचा सामना करावा लागला. शनिवारी मस्कटमध्ये आयोजित सामन्यात इंडिय महाराजा संघाला वर्ल्ड जायंट्सच्या संघाने ३ बळी राखून पराभूत केले. लक्षणीय बाब म्हणेज वर्ल्ड जायंट्सच्या या विजयाचा हिरो इमरान ताहिर ठरला. त्याने फलंदाजीतून कमाल करत केवळ १९ चेंडूत नाबाद ५२ धावा करून संघाला आव्हानापर्यंत पोहचवले.

Legends League Cricket Imran Tahir defeated India Maharaja's team by batting aggressively
इमरान ताहिरने फलंदाजीतून केली कमाल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये इंडिया महाराजा संघाला पहिल्यादांच पराभवाचा सामना करावा लागला.
  • इमरान ताहिरने केवळ १९ चेंडूत नाबाद ५२ धावा करून वर्ल्ड जायंट्सच्या संघाला विजय मिळवून दिला.
  • इंडिया महाराजा संघाकडून नमन ओझाने फक्त ६९ चेंडूत १४० धावांची शतकीय खेळी केली.

Legends League Cricket | नवी दिल्ली : लेजेंड्स लीग क्रिकेट (LLC) मध्ये इंडिया महाराजा संघाला पहिल्यादांच पराभवाचा सामना करावा लागला. शनिवारी मस्कटमध्ये आयोजित सामन्यात इंडिय महाराजा संघाला वर्ल्ड जायंट्सच्या संघाने ३ बळी राखून पराभूत केले. लक्षणीय बाब म्हणेज वर्ल्ड जायंट्सच्या या विजयाचा हिरो इमरान ताहिर (Imran Tahir) ठरला. त्याने फलंदाजीतून कमाल करत केवळ १९ चेंडूत नाबाद ५२ धावा करून संघाला आव्हानापर्यंत पोहचवले. शेवटच्या षटकात वर्ल्ड जायंट्सच्या संघाला १२ धावांची आवश्यकता होती. अशातच कर्णधार मोहम्मद कैफने (Captain Mohammad Kaif) वेणुगोपाल रावकडे (Venugopal Rao) गोलंदाजीची कमान सोपवली. मात्र दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इमरान ताहिरने फलंदाजी करताना वेगळ्याच अंदाजात खेळत होता. ताहिर शेवटच्या षटकातील पहिल्या आणि तिसऱ्या चेडूंवर षटकार लगावून संघाला विजय मिळवून दिला. सोबतच त्याने त्याचे वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. (Legends League Cricket Imran Tahir defeated India Maharaja's team by batting aggressively).

अधिक वाचा : संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

नमन ओझाची खेळी व्यर्थ

तत्पुर्वी, इंडिया महाराजाच्या संघाने २० षटकांत ३ बळी गमावून २०९ धावांची धावसंख्या उभारली होती. विकेटकिपर फलंदाज नमन ओझाने (Naman Ojha) फक्त ६९ चेंडूत १४० धावांची शतकीय खेळी केली. ओझाच्या या अविस्मरणीय खेळीत १५ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. तर मोहम्मद कैफने ४७ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या, ज्यामध्ये तीन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. 

पीटरसनचे अर्धशतक 

२१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केविन पीटरसनने शानदार खेळी करत संघाला जिवंत ठेवले. पीटरसनने २७ चेंडूंत सहा षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने ५३ धावांची खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूकडून गडी बाद होण्याची प्रक्रिया सुरूच होती. काळी काळ १६.२ षटकांत वर्ल्ड जायंट्सच्या संघाने १६० धावांत सात गडी गमावले होते आणि संघाचा विजय देखील कठिण वाटत होता. मात्र इमरान ताहीरने अप्रतिम खेळी करत इंडिया महाराजाच्या हातातून सामना हिसकावून घेतला. या स्पर्धेत इंडिया महाराजाने पहिल्या सामन्यात आशियाई लायन्स संघाचा सहा गडी राखून पराभव केला होता. त्या सामन्यात युसूफ पठानने शानदार फलंदाजी केली होती. युसूफने केवळ ४० चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८० धावांची खेळी केली होती. ज्याच्या जोरावर संघाने १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला होता. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी