जसा बाप तशी पोर; धोनीच्या मुलीला मिळाली मेस्सीच्या ऑटोग्राफची जर्सी

Lionel Messi jersey : एमएस धोनी फुटबॉलसाठी किती वेडा आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे पण त्याची मुलगी झिवा सिंग धोनी आता फुटबॉलवर तितकेच प्रेम करू लागली आहे.

Lionel Messi sent Dhoni's daughter Ziva an autographed Argentina jersey
जसा बाप तशी पोर; धोनीच्या मुलीला मिळाली मेस्सीच्या ऑटोग्राफची जर्सी ।   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • एमएस धोनी फुटबॉलचा मोठा चाहता
  • मुलगी झिवाही फुटबॉलची फॅन झाली आहे
  • लिओनेल मेस्सीने ऑटोग्राफ केलेली अर्जेंटिनाची जर्सी भेट

Lionel Messi sends jersey for Ziva Dhoni : भारताचा महान क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा सध्याचा कर्णधार एमएस धोनी फुटबॉलचा मोठा चाहता आहे, हे कोणापासूनही लपून राहिलेले नाही. मात्र, आता सोशल मीडियावर असे काही फोटो व्हायरल होत आहेत, जे पाहून असे दिसते की वडिलांच्या पाऊलांवर पाऊल टाकत मुलगी झिवाही फुटबॉलची फॅन झाली आहे. होय, सध्या आम्हाला जीवाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्याने अर्जेंटिना फुटबॉल संघाची जर्सी घातली आहे.

अधिक वाचा : India Squad for Sri Lanka: BCCIकडून श्रीलंका सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार- हार्दिककडे आली मोठी जबाबदारी

ही दोन्ही फोटो झिवा सिंग धोनीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आली. झिवाचे सोशल मीडिया तिचे पालक एमएस धोनी आणि साक्षी धोनी हाताळतात. अशा स्थितीत त्याच्या आई-वडिलांनी हे दोन फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये “Like father, like daughter! असे लिहिले.

लिओनेल मेस्सीने ऑटोग्राफ केलेली ही अर्जेंटिनाची जर्सी आहे असे दिसते आणि झिवाला ती ख्रिसमस भेट म्हणून मिळाली आहे. इंस्टाग्रामवर जीवा सिंग धोनीचे दोन्ही फोटो चाहत्यांनी लाइक केले आहेत. या पोस्टला काही तासांतच जवळपास 150,000 लाईक्स मिळाले आहेत. 

अधिक वाचा : अश्विन-अय्यरमुळे ढाक्यात भारताचा डंका, बांगलादेशविरुद्धच्या दोन्ही टेस्ट जिंकल्या

अर्जेंटिना नुकताच FIFA विश्वचषक 2022 चा चॅम्पियन बनला आहे. आपल्या देशासाठी अंतिम सामन्यात लिओनेल मेस्सी हिरो ठरला होता. या सामन्यात मेस्सीने दोन गोल केले आणि पेनल्टी शूटआऊटमध्येही गोल करून अर्जेंटिनाने फ्रान्सला अंतिम फेरीत पराभूत केले. दुसरीकडे, जर आपण एमएस धोनीबद्दल बोललो तर, माही आयपीएल 2022 सीझन संपल्यापासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कर्णधार आगामी IPL 2023 हंगामात पुन्हा मैदानात उतरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी